Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 9 एप्रिल 2021 | शुक्रवार | ABP Majha
महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर....
1. कोविडच्या लढाईत महाराष्ट्र कुठेही मागे नव्हता आणि राहणार नाही म्हणत या लढ्यात राजकारण करणाऱ्यांना समज द्यावी, मुख्यमंत्री ठाकरे यांची पंतप्रधानांना विनंती,
2. बीडच्या अंबाजोगाईतील दाम्पत्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू, चार वर्षांची मुलगी सुखरुप, दाम्पत्याची आत्महत्या की हत्या हे अद्याप अस्पष्ट,
3. ठाण्यात अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणीसाठी गर्दी, ठाण्यातील रुग्णसंख्या वाढीमुळं नागरिकांची कोरोना चाचणी केंद्रावर रीघ
4. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतीच, गुरुवारी 56 हजार 286 रुग्णांची नोंद, मुंबईत मागील 24 तासांत 8 हजार 938 नव्या कोरोना रुग्णांची नोंद,
5. कोरोना लसीच्या पुरवठ्यात उशीर झाल्यामुळं अॅस्ट्राझेनेकाची सीरमला कायदेशीर नोटीस, सीरम इन्स्टिट्यूटकडून कोविशील्ड लस निर्मितीसाठी भारत सरकारकडे हाक
6. राज्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने पावलं, केंद्राची 30 पथकं महाराष्ट्रात, कोरोना पार्श्वभूमीर शहरं आणि जिल्ह्यांचा आढावा,
7. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारचे निर्बंध, भुसावळसह राज्यातील व्यापारी संघटनांचा विरोध, कडक निर्बंधांविरोधात आंदोलनं
8. डोंबिवलीत डी मार्ट सील, ब्रेक दि चेन निर्बंधांच्या धास्तीनं नागरिकांनी खरेदीसाठी केली गर्दी
9. नागपूरमध्ये लॉकडाऊन आणि वीज बिलाच्या मुद्द्यावर आंदोलन, महाविकासआघाडी सरकारविरोधात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्त्वात भाजपचं आंदोलन
10. आजपासून आयपीएलच्या 14 व्या हंगामाला सुरुवात, पहिल्याच सामन्यात भिडणार मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरु