एक्स्प्लोर
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 28 फेब्रुवारी 2020 | शुक्रवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा 1. शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी आज जाहीर होणार, पहिल्या यादीतून फक्त 15 हजार शेतकऱ्यांना दिलासा, आज किती शेतकऱ्यांना दिलासा मिळतो याकडे सर्वांचं लक्ष 2. आदित्य ठाकरेंची रेशीम किड्याशी तुलना करणाऱ्या अमृतांना आवरा, शिवसेना नेते किशोर तिवारीचं संघाला पत्र, देवेंद्र फडणवीसांवरही हल्लाबोल 3. फडणवीस सरकारच्या कारभारावर कॅगचे ताशेरे, सिडको घोटाळ्याच्या अहवालावर मंत्रिमंडळात खलबतं, निवृत्त न्यायधीशांमार्फत चौकशीची सेनेची मागणी 4. सरकारी कर्मचाऱ्यांसोबत शाळांसाठीही 5 दिवसांच्या आठवड्याचे संकेत, सुप्रिया सुळेंचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना, 5. कोरेगाव भीमा प्रकरणातील 348, तर मराठा आंदोलनातील 460 गुन्हे मागे, गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती, गंभीर स्वरुपाचे गुन्हे अद्याप कायम 6. इंदोरीकर महाराजांच्या कोल्हापूर विद्यापीठातल्या कार्यक्रमाला अंदश्रद्धा निर्मूलन समितीचा विरोध, 15 दिवसांत इंदोरीकरांवर गुन्हा दाखल करण्याचीही मागणी 7. खासदारकी वाचवण्यासाठी भाजपचे जयसिद्धेश्वर शिवाचार्य पुन्हा हायकोर्टात, कॅव्हेटही दाखल 8. दिल्ली हिंसाचारातील मृतांची संख्या 38 वर, हिंसाचारानंतर आज पहिला शुक्रवार, नमाजच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांचा शहरात कडेकोट बंदोबस्त 9 देशात काही उलट सुलट झालं तर त्याला आपणच जबाबदार, दिल्लीतील हिंसाचारच्या पार्श्वभूमीवर मोहन भागवतांचं वक्तव्य 10. उष्णतेच्या लाटेनं मुंबईकर होरपळले, काल मुंबईत राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद, आजही स्थिती कायम राहण्याची शक्यता
आणखी वाचा






















