Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 27 जुलै 2021 | मंगळवार | ABP Majha
देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटीनमध्ये...
1. घरात पाणी शिरलेल्यांना 10 हजार, तर अन्न-धान्यासाठी 5 हजारांची तातडीची मदत; नुकसानग्रस्त भागातले रस्ते, वीज, पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
2. अतिवृष्टी आणि दरड कोसळून महाराष्ट्रात 164 जणांचा मृत्यू, 100 जण अद्यापही बेपत्ता, दोन लाख नागरिकांचं स्थलांतर
3. कोल्हापुरातून जाणारा पुणे-बंगळुरु महामार्ग अखेर सुरु, महामार्गावरील पाणी ओसरल्यानंतर वाहतूक सुरु करण्याचा निर्णय
4. केंद्र सरकारने डाळींवरील निर्बंध हटविल्याने डाळींच्या दरात 20 रूपयांची घट, डाळींच्या किंमती शंभरीच्या आत, सर्वसामान्यांना दिलासा
5. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा 61वा वाढदिवस, कोरोना आणि राज्यावर ओढवलेल्या नैसर्गिक संकटामुळं वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय, कार्यकर्त्यांनाही आवाहन
6. मुंबईतल्या मालाड, गोवंडीत दुधाची भेसळ करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई, पुरामुळे मुंबईत कमी येणाऱ्या दूध पुरवठ्यामुळे भेसळीची शक्यता
7. घरातूनच सिद्धिविनायकाचं दर्शन घ्या, कोरोनाच्या संकटात अंगारकी चतुर्थीला गर्दी टाळण्यासाठी आदेश बांदेकर यांचं आवाहन, मंदिराबाहेर पोलीस बंदोबस्त
8. आसाम आणि मिझोरममधल्या सीमावादावरुन रक्तपात, गोळीबारात 6 पोलीस ठार, गृहमंत्री अमित शाहांची दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा
9. कर्जबुडव्या विजय माल्ल्या ब्रिटीश कोर्टाकडून दिवाळखोर घोषित, बँका पैसे वसूल करु शकणार
10. टोकियो ऑलिम्पिकवर चक्रीवादळाचं सावट, तेपार्तक वादळामुळं अनेक स्पर्धा पुढे ढकलल्या