Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 23 मे 2021 | रविवार | ABP Majha
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1. मुंबईतला पॉझिटिव्हिटी रेट पाव टक्क्यापेक्षाही कमी, तर नाशकातला पॉझिटिव्हिटी रेट 8 टक्क्यांवर, कडक लॉकडाऊननंतर रुग्णसंख्येत घट
2. आठ दिवसांनंतर कोल्हापूरची कडक निर्बंधांतून सुटका, उद्यापासून नाशकातला लॉकडाऊन उठणार, तर अमरावतीत जीवनावश्यक वस्तूंची होम डिलिव्हरी सुरु
3. साताऱ्यात 25 मेपासून ते 1 जूनपर्यंत कडक लॉकडाऊन, कोरोना चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट असेल तरच अंत्ययात्रेला परवानगी, निर्बंध आणखी कडक
4. सीबीएससी बोर्डाच्या बारावीसह इतर महत्त्वांच्या परीक्षांबाबत आज महत्त्वाची बैठक, केंद्रीय शिक्षण मंत्री सर्व राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांशी संवाद साधणार
5. 14 राज्यांकडून म्युकर मायकोसिस आजार महामारी म्हणून घोषित, तर कोरोना उपचारामुळं संसर्ग होत नसल्याचं डॉ. लहानेंकडून स्पष्ट
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 23 मे 2021 | रविवार | ABP Majha
6 .रामदेव बाबांविरोधात गुन्हा दाखल करा; इंडियन मेडिकल असोशिएशनची मागणी, कोरोनावर अॅलोपॅथी उपचार पद्धत निष्फळ ठरत असल्याचा योगगुरुंचा दावा
7. रायगड आणि वलसाडच्या समुद्रकिनारी प्रत्येकी पाच मृतदेह सापडले, समुद्रातून वाहून आलेले मृतदेह पी 305 बार्जमधल्या कर्मचाऱ्यांचे असल्याचा संशय
8. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचं चक्रीवादळात रुपांत होण्याची शक्यता, 26 मे रोजी ओडिशा आणि बंगालच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज
9. आज मोह मायाची बंधने तोडणारी एकादशी म्हणजेच, अश्विन शुद्ध अर्थात मोहिनी एकादशी, पंढरपुरात विठुरायाच्या गाभाऱ्याला मोगऱ्याच्या फुलांची आरास
10. आजच्या पिढीला डोंगराच्या टोक गाठायचंय, पण डोंगर चढायचा नाहीये; जगप्रसिद्ध व्याख्याते गौर गोपाल दास यांच्यासोबत रंगला 'माझा कट्टा'























