Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 20 ऑगस्ट 2021 शनिवार | ABP Majha
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 20 ऑगस्ट 2021 शनिवार | ABP Majha
1. लवकरच 12 वर्षांवरील मुलांचं लसीकरण सुरु होणार, झायडस कॅडिलाच्या "झायकोव्ह-डी" लसीला मंजुरी, डिसेंबरपर्यंत 5 कोटी डोसचा पुरवठा होणार
2. राज्यात पवसाचं कमबॅक; कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाची संततधार, शेतकरी सुखावला
3. पुण्यातील आंबिल ओढा परिसरातील बांधकामं हटवण्यावरील स्थगिती न्यायालयाने उठवली, पालिकेकडून पुन्हा अतिक्रमण हटाव सुरु होण्याची शक्यता
4. राज्यातील नगरपंचायत, नगर परिषद निवडणुकांची तयारी, 23 ऑगस्टपासून निवडणुकांच्या पूर्वतयारीला सुरुवात, राज्य निवडणूक आयोगाने काढले आदेश
5. औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत ओबीसीतून आरक्षण देण्याचा ठराव, तर नांदेडच्या आंदोलनात संभाजीराजेंचा हल्लाबोल, संभाजीराजेंना अटक करण्याची सदावर्तेंची मागणी
6. कुर्ल्यातील गुन्हेगाराची चाळीतील रहिवाशांसह कुटुंबियांकडून हत्या, घराच्या आवारातच मृतदेह पुरला, पत्नीसह 7 जणांना अटक
7. ठाण्यातील सराफा व्यापाऱ्याचा मृतदेह कळव्याच्या रेतीबंदर खाडीत सापडला, 14 ऑगस्टपासून होते बेपत्ता, अपहरण करुन हत्येचा संशय
8. काँग्रेस नेत्यांविरोधातील तपासामध्ये मोठी भूमिका बजावलेले ईडीचे वरिष्ठ अधिकारी राजेश्वर सिंह भाजपात प्रवेश करणार?
9. भारत रशियाकडून 70 हजार एके- वन झिरो थ्री रायफल विकत घेणार, अमेरिकेकडून सिगसोर रायफल विकत घेतल्यानंतर शस्त्र खरेदीसाठी मोठा करार
10. घटत्या लोकसंख्येनं चीन हैराण, आता हम दो हमारे तीन नीतीला ड्रॅगनची मंजुरी, सरकार आर्थिक मदतही करणार