Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 16 ऑगस्ट 2021 | सोमवार | ABP Majha
देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटीनमध्ये...
1. राजधानी काबूलसह संपूर्ण अफगाणिस्थानवर तालिबान्यांचा ताबा, राष्ट्रपती भवनावरही कब्जा, रक्तपात टाळण्यासाठी सबब देत राष्ट्रपती अशरफ गनी यांनी देश सोडला
2. काबुलमध्ये अडकलेल्या 129 भारतीयांना घेऊन एअर इंडियाचं विमान राजधानी दिल्लीत दाखल, घरदार सोडून परतावं लागल्यानं अनेकजण भावुक
3. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज तिसरी पुण्यतिथी; राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी 'सदैव अटल' स्थळी जाऊन आदरांजली वाहिली
4. आजपासून राज्यात अनेक ठिकाणी निर्बंध शिथील, मॉल, शॉपिंग सेंटरमधील दुकानं रात्री दहावाजेपर्यंत सुरु राहणार; सिनेमागृह, नाट्यगृह पुढील आदेशापर्यंत बंदच
5. स्वातंत्र्य दिनी दोन डोस घेतलेल्यांची लोकलवारी सुरु; फक्त पासधारकांनाच मुभा, आतापर्यंत 1 लाख 21 हजार नागरिकांनी काढला पास
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 16 ऑगस्ट 2021 | सोमवार | ABP Majha
6. केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या 39 नवनिर्वाचीत मंत्र्यांची आजपासून जनआशीर्वाद यात्रा, भागवत कराडांच्या यात्रेला पंकजा मुंडे हिरवा कंदील दाखवणार
7. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची हीच ती वेळ, पालकमंत्री सुभाष देसाईंचं वक्तव्य, सहकारी पक्षांकडून सहकार्य मिळेल असा विश्वास
8. 'मरुद्या मुख्यमंत्री'... सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ओघात केलेल्या वक्तव्याची चर्चा, शिवसेनेच्या रोषानंतर दिलगिरी व्यक्त
9. राज्यपाल नियुक्त 12 जागा भरण्यासाठी काँग्रेस आमदाराची थेट राज्यपालांना विनंती, सरकारच आग्रह धरत नसल्याचं राज्यपाल कोश्यारींचं वक्तव्य
10. नाशिक जिल्ह्यातील 23 पैकी 12 धरणांत 50 टक्क्यांपेक्षाही कमी पाणीसाठा, पावसानं पुरेशी हजेरी न लावल्यास संकट अटळ, मराठवाड्यासाठी होणाऱ्या आवर्तनावरही प्रश्नचिन्ह