Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 13 सप्टेंबर 2021 | सोमवार | ABP Majha
देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटीनमध्ये...
1. पावसाच्या नॉन स्टॉप बॅटिंगमुळं मुंबई, पुणे, नाशकातली धरणं भरली; कोयनेतूनही विसर्ग सुरु, भंडारदऱ्याचं सौंदर्य खुललं
2. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं पावसाचा जोर वाढणार, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना
3.वांद्र्याच्या ताज हॉटेलमध्ये गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यास मॅनेजमेंटकडून नकार, 2 तास मूर्ती घेऊन आलेल्या कर्मचाऱ्यांना ताटकळत ठेवलं
4. ठाकरे सरकारमधल्या मोठ्या नेत्याच्या भ्रष्टाचाराची फाईल हाती लागल्याचा किरीट सोमय्यांचा दावा; आज पत्रकार परिषद घेऊन पर्दाफाश करणार
5. विसर्जनावरुन परतत असताना 4 जणांचा अपघातात मृत्यू, ठाण्यातील अंबरनाथमध्ये रिक्षाचा भीषण अपघात, तर बेळगावात ट्रक, जीपच्या अपघातात 8 ठार
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 13 सप्टेंबर 2021 : सोमवार : ABP Majha
6. नवी मुंबईत एपीएमसी मार्केटमध्ये आढळली शरीराच्या तुकड्यांनी भरलेली प्लास्टिकची बॅग, धड गायब, अधिक तपास सुरु
7. सोनपावलांनी घरोघरी गौराईचं आगमन, आज गौरीपूजन, घराघरांत फुगडी, झिम्मा खेळून गौराईचा जागर, पंढरपुरात विठ्ठल मंदिराला सजावट
8. गुजरातच्या राजकीय वर्तुळात दादा म्हणून परिचीत असणारे भूपेंद्र पटेल मुख्यमंत्रिपदासाठी शपथ घेणार, भाजपपासून दुरावत चाललेला पाटीदार समाजाचा विश्वास संपादन करण्याचं आव्हान
9. हल्ल्याच्या 20 वर्षांनंतर 9/11 हल्ल्याची काही गुपितं अमेरिकेकडून उघड, हल्ल्यासाठी रसद पुरवण्याचा पर्दाफाश, सौदी अरेबियाच्या कनेक्शनवर प्रकाश
10. ज्योकोविचचं मोसमातलं चौथं ग्रॅंड स्लॅम हुकलं, रशियाच्या डॅनियल मेद्वेदेवला अमेरिकन ओपनचं विजेतेपद, ज्योकोविचची कॅलेंडर ग्रॅंड स्लॅमची संधी हुकली