Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 1 सप्टेंबर 2021 बुधवार | ABP Majha
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 1 सप्टेंबर 2021 बुधवार | ABP Majha
1. चाळीसगावात पुराचं पाणी ओसरलं, साडेसातशेहून अधिक घरांचं नुकसान, तर पाचशेहून अधिक गुरं दगावली, कन्नडचा घाट अजूनही बंदच
2. मराठवाड्याला पावसानं झोडपलं, 67 मंडळात अतिवृष्टीची नोंद तर बीड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस
3. राज्यात रुग्णसंख्या वाढल्यास जमावबंदी की रात्रीची संचारबंदी? दुपारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खलबताची शक्यता
4. मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत हळूहळू वाढ, रुग्ण दुपटीचा कालावधीही 1511 दिवसांवर पोहोचला
5.ओबीसी आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत निवडणुका नकोत, राष्ट्रवादीचा सूर, तर ओबीसीच्या कोट्यातून मराठा आरक्षण नको, वडेट्टीवारांचा आक्रमक पवित्रा
6. गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकणवासियांना एसटीचं मोठं गिफ्ट, आजपासून रत्नागिरीत 100 टक्के क्षमतेनं एसटी धावणार
7. आजपासून आर्थिक व्यवहारांत बदल होणार, जीएसटी रिटर्न, PF UAN पासून आधार लिंक करण्यासाठी नवे नियम लागू
8. बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना दिलासा, नरेगा घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाच्या अवमानाची प्रक्रिया रद्द
9. पिंपरी चिंचवडमध्ये झोपाळा खेळताना गळफास लागून 8 वर्षाच्या मुलीचा मृत्यू, तर मुंबईच्या चेंबूरमध्ये बाथरुममधल्या बादलीत बुडून चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू
10. भारताचे कतारमधील राजदूत आणि तालिबानचा नेता शेर मोहम्मद अब्बास यांच्यात बैठक, तालिबानकडून भारतीयांच्या सुरक्षिततेची आणि घरवापसीची हमी