(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 07 मे 2021 शुक्रवार | ABP Majha
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 07 मे 2021 शुक्रवार | ABP Majha
1. दुसऱ्या लाटेतील कोरोनास्थितीचा पंतप्रधानांकडून आढावा, 1 लाखापेक्षा जास्त रुग्णसंख्या असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये मुलभूत आरोग्य सेवा वाढवण्याचे आदेश
2. तिसरी लाट अटळ पण तयारी काय केली? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल, विविध विषयांवर प्रश्नांची सरबत्ती
3. राज्यात गुरुवारी 62,194 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ तर 63,842 रुग्ण कोरोनामुक्त
4. जे मुंबईत शक्य आहे ते पुण्यात का नाही? इतर महापालिका बीएमसीचा आदर्श का ठेवत नाहीत? मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
5. मराठा आरक्षण रद्द झाल्यानं एसईबीसी प्रवर्गातील 6 हजार पदांवर प्रश्नचिन्हं, ठाकरे सरकारसमोर नवा पेच
6. स्पुटनिक लाईटचा एकच डोस 80 टक्के प्रभावी, रशियाचा दावा, स्पुटनिक व्हीची खेप भारतात, स्पुटनिक लाईटबद्दल उत्सुकता
7. एक जूनला मान्सूनचे केरळात आगमन होणार, 10 जूनला मान्सून तळकोकणात वर्दी देणार तर 15 ते 20 जूनपर्यंत पूर्ण महाराष्ट्र व्यापण्याचा अंदाज
8. अमरावतीतल्या ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, 130 गावांमध्ये 10 दिवस पूर्ण प्रवेशबंदी, तहसीलदारांचे गावबंदीचे आदेश
9. संगमनेर शहरात संचारबंदी काळात गस्त घालणाऱ्या पोलिसांवर जमावाचा हल्ला, 6 जणांसह अज्ञात जमावावर गुन्हा नोंद
10 . चाक निखळल्यानंतरही एअर अॅम्ब्युलन्सचे मुंबई विमानतळावर सुरक्षित लँडिंग, नागपूरहून उड्डाण घेताच तांत्रिक बिघाड