Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 03 जुलै 2021 | शनिवार | ABP Majha
देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटीनमध्ये...
1. पायी वारीसाठी ठाम असणारे बंडातात्या कराडकर पोलिसांच्या ताब्यात, वारीसाठी पायी निघालेल्या कराडकर समर्थकांनाही पोलिसांनी रोखलं
2. लसीकरण पूर्ण झालेल्यांना लोकलनं प्रवास करु द्या, प्रवासी संघटनेचं सरकारला साकडं; लोकलअभावी कार्यालय गाठणं अशक्य झाल्यानं लाखोंच्या रोजीरोटीचा प्रश्न
3. राज्यातील बारावी परीक्षेच्या निकालाचा फॉर्म्युला ठरला; दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरणार
4. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जरंडेश्वर साखर कारखान्याची विक्री; ईडीच्या कारवाईवर अजित पवारांची प्रतिक्रिया, तर सत्तेचा गैरवापर करुन कारखाना मिळवला शालीनीताईंचा आरोप
5. बकरी ईद साधेपणाने साजरी करा, राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी, प्रतिकात्मक कुर्बानी देण्याचंही आवाहन
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 03 जुलै 2021 | शनिवार | ABP Majha
6. प्रश्न विचारायचे असतील तर मला मुख्यमंत्री करा, बीडमधील जनसंवाद कार्यक्रमादरम्यान संभाजीराजे छत्रपतींच्या वक्तव्याची जोरदार चर्चा
7. गर्भवती महिलांच्या लसीकरणाचा मार्ग अखेर मोकळा, केंद्राकडून नियमावली जाहीर, तर नागपुरात 2 ते 6 वर्षांच्या मुलांवर कोरोना लसीची चाचणी सुरु
8. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथसिंह रावतांचा अवघ्या चार महिन्यांत राजीनामा, कोरोनामुळे पोटनिवडणुका होणार नसल्यानं विधानसभेचं सदस्यतत्व मिळवण्यास असमर्थ
9. परकीय चलनासंदर्भातील व्यवहाराप्रकरणी अभिनेत्री यामी गौतमला ईडीचं समन्स, तर संदेसरा ग्रुप कथित घोटाळा प्रकरणी डिनो मोरिया, संजय खान, डीजे अकील आणि अहमद पटेलांच्या जावयाची संपत्ती जप्त
10. धोनीसाठी बंदुकीची गोळीही झेलीन, आंतरराष्ट्रीय मासिकाला दिलेल्या मुलाखतीत के. एल. राहुलकडून कॅप्टन कूलचं तोंडभरुन कौतुक