एक्स्प्लोर

Majha Katta : उद्योगासाठी फक्त पैसाच नव्हे तर 'या' गोष्टीतही हवी गुंतवणूक; अर्थ सल्लागार प्रफुल्ल वानखेडेंचा मौल्यवान सल्ला

Majha Katta : 'गोष्ट पैशापाण्याची' या पुस्तकाचे लेखक, अर्थ सल्लागार प्रफुल्ल वानखेडे यांनी उद्योग-व्यवसाय करताना आलेली आव्हाने सांगताना तरुणांना मौल्यवान सल्ला दिला.

Majha Katta :  अनेकांचे उद्योजक होण्याचे स्वप्न असते. मात्र, सर्वांनाच उद्योजक होणे शक्य नसते. उद्योग सुरू करताना फक्त पैशांचीच नव्हे तर माणसांमध्ये आणि तंत्रज्ञानामध्येही गुंतवणूक आवश्यक असल्याचे अर्थ सल्लागार, उद्योजक प्रफुल्ल वानखेडे (Prafulla Wankhede) यांनी सांगितले. एबीपी माझाच्या 'माझा कट्टा'वर त्यांनी अर्थ साक्षरता आणि त्याचे महत्त्व अधोरेखित केले.

'गोष्ट पैशापाण्याची' या पुस्तकामुळे बहुचर्चित आणि लोकप्रिय झालेल्या प्रफुल्ल वानखेडे यांनी माझा कट्ट्यावर आपले अनुभव सांगितले. त्यांनी म्हटले की, पुस्तकांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. वर्ष 2007 मध्ये मला उद्योगात नुकसान झाल्यानंतर पुस्तकांनी मला सावरण्यास मदत केली. अनेक नामवंतांनी आपले अनुभव पुस्तकांतून व्यक्त केले होते. त्यामुळे आपलं नेमकं काय चुकलं याचा अंदाज आला. आपलं सगळं बरोबर असतं असं नाही, आपल्याकडून काही चुका होऊ शकतात, हे मान्य केलं  की पुढील प्रवास सहज शक्य आहे असेही त्यांनी म्हटले. 

नवीन उद्योग सुरू करण्याबाबत प्रफुल्ल वानखेडे यांनी सांगितले की, प्रत्येक उद्योग सुरू करताना सगळ्यांकडेच फार पैसा नसतो. माणसं, तंत्रज्ञान यामध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. 2007 मध्ये उद्योग सुरू करताना माझ्या हाती एक महिन्याचा पगार होता. उद्योग सुरू करण्यासाठी पॅशन हवी, नियोजन हवे असेही त्यांनी म्हटले. नवा उद्योग सुरू केल्यानंतर तुमचे ग्राहक तुम्हाला पैसे देतात,  असेही त्यांनी म्हटले. आपण स्वत: उद्योग सुरू केल्यानंतर एका कंपनीने आम्हाला आधीच अॅडव्हान्स दिला होता. त्यातून आम्ही पुढे काम करण्यास सुरुवात केली. नोकरीत असताना अथवा उद्योग करताना तुम्ही माणसं कशी जोडता, हेदेखील महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. नवीन उद्योग सुरू करताना आणि आपल्या वाईट काळात आधी असलेले संबंध आणि चांगली प्रतिमा मदतीला आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

अर्थ साक्षरता का महत्त्वाची वाटली?

प्रफुल्ल वानखेडे यांनी म्हटले की, कोरोना काळात अनेकांची आर्थिक परिस्थिती कोलमडली होती. अनेकांना चांगला पगार असूनही अनेकांची परिस्थिती वाईट झाली होती. यामध्ये मित्र, वेंडर, ओळखीतील अनेकांचा समावेश होता. एकवेळ रोजंदारीवर असणाऱ्यांची स्थिती आपण समजू शकतो. मात्र, ज्यांना चांगला पगार आहे, आर्थिक स्थैर्य आहे. त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल हे दिसून आले. त्यातून हा अर्थसाक्षरता करायला हवी असे वाटले असल्याचे वानखेडे यांनी सांगितले. 

'एबीपी माझा'मुळे बळ मिळाले

प्रफुल्ल वानखेडे यांनी म्हटले की, कोरोना काळता एबीपी माझाच्या वेब पोर्टलवर  उद्योजकांसाठी फंड मॅनेजमेंटच्या मुद्यावर ब्लॉग लिहिला होता. त्याचे स्वागत झाले. या मार्गदर्शनाची गरज होती, असे अनेकांनी म्हटले. मग, सोशल मीडियावर अर्थ साक्षरतेबाबत मांडणी करू लागलो. सोशल मीडियाचा फायदा झाला. लोकांसाठी आर्थिक साक्षरतेचा मुद्दा मांडला होता आणि त्यांना आवडला असल्याचे त्यांनी सांगितले. सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करता येऊ शकतो असेही त्यांनी म्हटले. 

यशस्वी मराठी उद्योजकांच्या गोष्टी का नाहीत?

आपल्या महाराष्ट्रात अनेकजण यशस्वी उद्योजक आहेत. अनेक उद्योजक हे आपल्या घराण्याचा वारसा चालवत आहेत. मराठी माणूसदेखील यशस्वी उद्योजक होऊ शकतो. चांगल्या मार्गाने पैसा कमावता येतो, हे आपण मनाशी बांधले पाहिजे. आपल्याकडे यशस्वी मराठी उद्योजकांच्या गोष्टी सांगितल्या जात नाहीत. मात्र, अपयशाच्या गोष्टी अधिकच सांगितल्या जातात, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. 

त्यासाठी 'गोष्ट पैशापाण्याची' पुस्तक वाचू नका

झटपट पैसे कमवण्यासाठी, श्रीमंत होण्यासाठी जो 'गोष्ट पैशापाण्याची' पुस्तक वाचणार आहे, तो गंडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. हे पुस्तक अर्थ साक्षरतेबाबत आहे. वाचकांनी हे पुस्तक आनंदासाठी वाचावे. यात मातीतील गोष्ट आहे, असे समजून घ्यावे असेही त्यांनी म्हटले. 'गोष्ट पैशापाण्याची' या पुस्तकाच्या माध्यमातून अनेकांनी पहिल्यांदाच पुस्तक वाचन केले असल्याचेही त्यांनी म्हटले. 

माणुसकीचा धडा मोठा

आपल्या संघर्ष काळातील आठवण सांगताना प्रफुल्ल वानखेडे यांनी सांगितले की, पहिल्या उद्योगात मोठा फटका बसल्याने आर्थिक संकट निर्माण झाले होते. त्यावेळी मुंबईत विचारात मग्न असताना चुकून सायन येथे उतरलो होतो. त्यावेळी कांदिवलीसाठी रिक्षा घेतली. या दरम्यान, ज्यांच्याकडून पैसे घेतले होते. त्यांचे फोन आले होते. या दरम्यान माझे संभाषण रिक्षावाल्याने ऐकले. प्रवासात असताना रिक्षावाल्याने मध्येच रिक्षा थांबवली आणि मला खाऊ घातले. त्यानंतर मी माझी परिस्थिती इतकीही वाईट नाही, असे सांगण्याचा प्रयत्न करत होतो. त्यावेळी त्याने 'हमे बहोत दूर का सफर करना है, अभी कुछ बोलो मत' असे म्हटले. कांदिवली येथे उतरल्यानंतर पैसे देण्याआधीच त्याने तात्काळ रिक्षा वळवली आणि निघून गेला. ही माणुसकी मुंबई सारख्या शहरात पाहायला मिळते. हा माणुकीचा धडा माझ्यासाठी मौल्यवान असल्याची भावना वानखेडे यांनी व्यक्त केली. 

Praful Wankhede at Majha Katta : 'गोष्ट पैशापाण्याची' पुस्तकाचे लेखक प्रफुल्ल वानखेडे माझा कट्ट्यावर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
Prashant Kishor : बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
US Citizenship Rule : 43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07PM 26 February 2025Swargate Bus Crime : स्वारगेट प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजेABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06PM 26 February 2025Swargate Bus Depo Crime : आरडाओरडा केल्यास जीवे मारण्याची आरोपीची तरुणीला धमकी, धक्कादायक माहिती समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
Prashant Kishor : बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
US Citizenship Rule : 43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
Pune Crime: पुण्यातील स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर, पोलिसांची 8 पथकं सक्रिय
पुण्यातील स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर, पोलिसांची 8 पथकं सक्रिय
फिक्सरवर सिक्सर... तानाजी सावंत, अब्दुल सत्तारांसह 3 मंत्र्‍यांची नावे; अमोल मिटकरींचे OSD वरुन गंभीर आरोप
फिक्सरवर सिक्सर... तानाजी सावंत, अब्दुल सत्तारांसह 3 मंत्र्‍यांची नावे; अमोल मिटकरींचे OSD वरुन गंभीर आरोप
लेकीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज अन् दमलेल्या बापाची व्हिसासाठी वणवण; मंत्र्यांच्या दरवाजे झिजवूनही पदरी निराशा
लेकीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज अन् दमलेल्या बापाची व्हिसासाठी वणवण; मंत्र्यांच्या दरवाजे झिजवूनही पदरी निराशा
मी त्यांना भीक घालत नाही; संतोष देशमुख हत्याप्रकरणातील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया
मी त्यांना भीक घालत नाही; संतोष देशमुख हत्याप्रकरणातील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget