एक्स्प्लोर
Advertisement
LIVE : जूनमध्ये राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता: सूत्र
हेडलाईन्स:
मुंबई उपनगरातील विक्रोळी आणि भांडुपमध्ये जोरदार पाऊस, रस्ते वाहतुकीवर परिणाम, मुलुंड टोलनाका ते भांडुप पंपिंगपर्यंत वाहनांच्या रांगा
-------------------------------------
जून महिन्यात राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता, मित्र पक्षातील सदाभाऊ खोत, विनायक मेटे, महादेव जानकरांना संधी मिळणार. राज्यात 10 मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता. तर आरपीआयच्या रामदास आठवलेंना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता - सुत्रांची माहिती
-------------------------------------
राज्यसभेच्या जागेसाठी शिवसेना उमेदवार संजय राऊत तर विधानपरीषदेच्या जागेसाठी दिवाकर रावते आणि सुभाष देसाई उद्या सकाळी 11 वाजता विधान भवनात उमेदवारी अर्ज भरणार
-------------------------------------
मुंबई : रस्ते घोटाळाप्रकरण- दोषी कंत्राटदारांना दिलेली कंत्राटं रद्द करणार का?, उच्च न्यायालयाची महापालिकेला विचारणा
-------------------------------------
मुंबई : मध्य रेल्वेचा खोळंबा, सायन स्टेशनला गाडीच्या पेंटाग्राफमध्ये बिघाड, ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत
-------------------------------------
विधानपरिषदेसाठी भाजपकडून सदाभाऊ खोत आणि विनायक मेटे यांना तिकीट मिळण्याची शक्यता : सूत्र
-------------------------------------
तडीपार गुंडाला आश्रय देणारा नाशिकरोडचा अपक्ष नगरसेवक पवन पवारला अटक, नाशिक पोलिसांची कारवाई
-------------------------------------
बुलडाणा जिल्ह्यात मुसळधार पावसासह गारपीट
-------------------------------------
रायगड : मुंबई-गोवा हायवेवर कशेडी घाटात एसटी आणि बाईकचा अपघात, एकाचा मृत्यू तर एक जखमी
-------------------------------------
वसई : विधानपरिषद निवडणुकीसाठी हितेंद्र ठाकूर यांचा राष्ट्रवादीच्या वसंत डावखरेंना पाठिंबा
-------------------------------------
रत्नागिरी : नेवरे समुद्रात मच्छिमार नौका बुडाली, एका खलाशाचा मृत्यू तर चार जणांना वाचवण्यात यश
-------------------------------------
1. बारावीचा आज निकाल, दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार, ३ जूनला मिळणार मार्कशीट बारावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी क्लिक करा
-------------------------------------
2. शासकीय महाविद्यालयातील जागा सीईटीतून भरणार, अध्यादेशावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यानं विद्यार्थ्यांना दिलासा, खाजगी महाविद्यालयांना मात्र नीट आवश्यक
-------------------------------------
3. यंदा सरासरीपेक्षा चांगला पाऊस, स्कायमेटचा अंदाज, जून महिन्यात मात्र पावसाची हुलकावणी, जुलैपासून तुफान बरसण्याची शक्यता
-------------------------------------
4. जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून राज्यात 2 हजार 407 किलो मीटर रुंदीकरण, खोलीकरणाचं काम, 25 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचा निर्धार, माझाचा स्पेशल रिपोर्ट
-------------------------------------
5. दुष्काळी पट्ट्यात बांधकामांना पाणी नको, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, तर बिअर कंपन्यांना शंभर टक्के पाणीबंदी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
-------------------------------------
6. ब्रेडच्या मुद्द्यावरून आसोचम संस्थेनं सीएसईला सुनावले खडे बोल, बेकरी उद्योगाची बदनामी केल्याचा आरोप, तर राज्यातल्या ब्रेडच्या नमुन्यांचीही तपासणी होणार
------------------------------------
7. दिल्लीच्या नजफगडमध्ये एअर अॅम्बुलन्सची इमरजन्सी लँडींग, विमानातल्या रुग्णासह सातही प्रवासी सुरक्षित, मोठा अनर्थ टळला
-------------------------------------
8. दिल्लीतल्या ढोंगी बाबाचा पर्दाफाश, परमानंदवर तब्बल १०० बलात्काराचे आरोप, मूल होण्याचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
-------------------------------------
9. मुलीकडून जन्मदात्या आईला बेदम मारहाण, दिल्लीतील घटनेची दृश्यं कॅमेरात कैद, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
नागपूर
Advertisement