एक्स्प्लोर

Aaditya Thackeray : आज आनंदाचा दिवस, मला पोरकट राजकारणात जायचं नाही, जांबोरी मैदानावरुन आदित्य ठाकरेंचं वक्तव्य  

दही हंडी महोत्सवाची एक वेगळीच मजा असल्याचे मत शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी व्यक्त केले. वरळीतील जांबोरी मैदानाच्या बाबत देखील आदित्य ठाकरेंना यावेळी प्रश्न विचारण्यात आला.

Aaditya Thackeray : सगळीकडे दही हंडीचा (Dahi Handi) उत्साह चांगला आहे. मी अनेक ठिकाणी फिरणार आहे. या दही हंडी महोत्सवाची एक वेगळीच मजा असल्याचे मत शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी व्यक्त केले.  वरळीतील जांबोरी मैदानाच्या (Jambori Maidan) बाबातीत देखील आदित्य ठाकरेंना यावेळी प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी सांगितलं की, मला या पोरकट राजकारणात जायचं नाही. दही हंडीसाठी जांबोरी मैदान मिळावं यासाठी आम्ही अॅप्लायच केले नव्हते. आज आनंदाचा दिवस आहे. सर्वांनी तो उत्साहत साजरा करावा असेही ठाकरे म्हणाले.

प्रत्येक गोष्टीत राजकारण आणू नका

दोन वर्षापूर्वीच अडीच कोटी रुपये खर्चून आम्ही जांबोरी मैदान चांगले केले आहे. माझी सर्वांना एवढीच विनंती आहे की, प्रत्येक गोष्टीत राजकारण आणू नका. हा बालिशपणा असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. मागील दोन वर्ष कोरोनाच्या संकटात गेली. त्यामुळं आपल्याला हा उत्सव साजरा करता आला नव्हता. पण यावर्षी मात्र, जल्लोषात दही हंडीचा उत्सव साजरा केला जात असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. मी अनेक ठिकाणी जात आहे. प्रतिसाद चांगला मिळत आहेत. दही हंडी उत्साहात साजरी केली जात आहेत. पोरकट राजकारणात जायचं नाही. 

भाजपने (bjp) वरळीच्या जांबोरी मैदानात दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. त्यामुळं ही शिवसेनेवर मात असल्याचे बोलले जात होते. वरळीत शिवसेनेचे (shivsena) तीन आमदार आणि एक खासदार असूनही शिवसेनेला वरळीचं जांबोरी मैदान मिळवता आलं नाही. त्यातही शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात भाजपने घुसखोरी केल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. पण यावर आज आदित्य ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आम्ही दही हंडीसाठी जांबोरी मैदान मिळावं यासाठी आम्ही अॅप्लायच केले नव्हते, असे ठाकरे म्हणाले. मला या पोरकट राजकारणात जायचं नाही. आजचा आनंदाचा दिवस असल्याचे ते म्हणाले. 

 देशभरात गोपाळकालाचा उत्साह

देशभरात गोपाळकालाचा (Gopalkala) उत्साह पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात दहीहंडीचं (Dahihandi) वेगळं आकर्षण आहे. राज्यात दहीहंडीची विशेष उत्साह दिसत आहे. मुंबई, ठाण्यासह पुण्यात दहीहंडीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. विविध मंडळांकडून दहीहंडी उत्सवात लाखोंच्या बक्षीस देण्यात येतात. गोविंदा पथकं अनेक महिने मानवी मनोरे लावण्यासाठी सराव करत असतात. कोरोना संकटामुळं यंदा तब्बल दोन वर्षांनी दहीहंडी साजरी होणार आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यातील गोविंदा पथकं मनोरे रचायला सज्ज झाले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून सुरक्षेची सर्वोतोपरी काळजी घेतली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

कारखाने कसे चालतात हे ज्यांना माहित नाही त्यांना काय उत्तर देणार, रोहित पवारांचा राजेंद्र राऊतांना टोला, तर जयकुमार गोरे सकाळ दुपार संध्याकाल कष्ट करतात
कारखाने कसे चालतात हे ज्यांना माहित नाही त्यांना काय उत्तर देणार, रोहित पवारांचा राजेंद्र राऊतांना टोला, तर जयकुमार गोरे सकाळ दुपार संध्याकाल कष्ट करतात
Maharashtra Live blog updates: साताऱ्यातील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस!
Maharashtra Live blog updates: साताऱ्यातील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस!
Beed Tiger Attack: जनावरांसाठी गवत कापताना वाघाची झडप, शेतकऱ्याला अर्धा किलोमीटर फरफटत नेलं, जागीच अंत; बीडच्या आष्टी तालुक्यात खळबळ
जनावरांसाठी गवत कापताना वाघाची झडप, शेतकऱ्याला अर्धा किलोमीटर फरफटत नेलं, जागीच अंत; बीडच्या आष्टी तालुक्यात खळबळ
Devendra Fadnavis: दिवाळीच्या दिवशीही मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; नागपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार संवाद, रखडलेला खोरी जलसिंचन प्रकल्प मार्गी लागणार?
दिवाळीच्या दिवशीही मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; नागपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार संवाद, अनेक दशक रखडलेला खोरी जलसिंचन प्रकल्प मार्गी लागणार?

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Tiger Attack: जनावरांसाठी गवत कापताना वाघाची झडप, शेतकऱ्याला अर्धा किलोमीटर फरफटत नेलं, जागीच अंत; बीडच्या आष्टी तालुक्यात खळबळ
जनावरांसाठी गवत कापताना वाघाची झडप, शेतकऱ्याला अर्धा किलोमीटर फरफटत नेलं, जागीच अंत; बीडच्या आष्टी तालुक्यात खळबळ
Mumbai Fire Accident : मुंबईमध्ये 32 मजली इमारतीत अग्नितांडव, 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला आग, एकाचा मृत्यू, सामानही जळून खाक, नेमकं काय घडलं?
मुंबईमध्ये 32 मजली इमारतीत अग्नितांडव, 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला आग, एकाचा मृत्यू, सामानही जळून खाक, नेमकं काय घडलं?
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
Maharashtra Live blog updates: साताऱ्यातील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस!
Maharashtra Live blog updates: साताऱ्यातील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस!
Devendra Fadnavis: दिवाळीच्या दिवशीही मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; नागपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार संवाद, रखडलेला खोरी जलसिंचन प्रकल्प मार्गी लागणार?
दिवाळीच्या दिवशीही मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; नागपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार संवाद, अनेक दशक रखडलेला खोरी जलसिंचन प्रकल्प मार्गी लागणार?
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
Sonia Gandhi Journey of Love: माझ्या राजकारणातील प्रवेशास राहुल-प्रियांकाचा विरोध होता, सोनिया गांधींना सांगितलं पंतप्रधानपद नाकारण्यामागचं कारण
माझ्या राजकारणातील प्रवेशास राहुल-प्रियांकाचा विरोध होता, सोनिया गांधींना सांगितलं पंतप्रधानपद नाकारण्यामागचं कारण
Embed widget