Aaditya Thackeray : निवडणुकीच्या तोंडावर लोकार्पणाचे कार्यक्रम, कोस्टल रोड पूर्ण न करता श्रेय घेण्याचा प्रकार; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
Aaditya Thackeray : निवडणुकीच्या तोंडावर लोकार्पणाचे कार्यक्रम होत असल्याचा कडाडून हल्लाबोल शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केला.
मुंबई : बीएमसीचा प्रकल्प असलेला कोस्टल रोड प्रकल्प आम्ही राबवला. त्याच कोस्टल रोडचे काम पूर्ण न करता श्रेय घेण्याचा प्रकार सुरु आहे. निवडणुकीच्या तोंडावर लोकार्पणाचे कार्यक्रम होत असल्याचा कडाडून हल्लाबोल शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. कोस्टल रोडच्या पहिल्या 10 किमीचे लोकार्पण पीएम मोदींकडून होत आहे. आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना सीएस बनायचे आहे किंवा दिल्लीत जायचं आहे. त्यामुळे ते खोटी माहिती देत आहेत असल्याचे आदित्य म्हणाले. मुंबई लुटली तसे देश राज्य लुटतील. अंडर ग्राऊंड कार पार्किग होऊ देणार नाही. मुंबईकरांच्या पैशातून तबेले बांधू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
ज्यांचा मुंबईशी काहीही सबंध नाही ते उद्घाटन करणार
आदित्य ठाकरे म्हणाले की, एमएमआर रिझनमध्ये अनेक गमती होत आहेत. कोस्टल रोड प्रकल्प उद्धव साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या प्रकल्पासाठी आम्ही अनेक भेटी दिल्या. बोगद्याची सुद्धा पाहणी केली आहे. मात्र, ज्यांचा मुंबईशी काहीही सबंध नाही ते उद्घाटन करणार आहेत. डिसेंबर महिन्यात कोस्टल रोडचे काम पूर्ण व्हायला हवे होते. एमटीएचएलचे तीन महिने उद्घाटन झाले नव्हते. कोस्टल रोड पूर्ण नसतानाही उद्घाटन केले जात असल्याचा आरोपही आदित्य यांनी केला.
भाजपने भूमिका स्पष्ट करावी
आदित्य म्हणाले की, भाजपने रेसकोर्सबाबत समर्थन आहे की विरोध याबाबत भाजपने त्यांची भूमिका स्पष्ट करावी. मुंबईच्या रेसकोर्सवर हजारो मुंबईकर धावायला, योगा करायला जातात, तसेच अनेक कार्यक्रम होतात. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचे मित्र आहेत, बिल्डर आहेत त्यांची बातमी फुटली. क्लब हाऊस बांधणार नाही असं ठरलं आहे. थीम पार्कऐवजी आता सेंट्रल पार्क करू असे सांगत आहेत. कोणत्या काँट्रॅक्टरसाठी भूमिगत कार पार्कि बनवत आहेत? कोणत्याही खर्चासाठी टेंडर घ्यावे लागते. मात्र, शंभर कोटी घोड्यांच्या तबेल्यासाठी वापरले जातात. सुटबुटातील लोकांच्या घोड्यांसाठी शंभर कोटी वापरले जाणार आहेत असा आरोप आदित्य यांनी केला.
इतर महत्वाच्या बातम्या