संतप्त गावकऱ्यांचे अनोखे आंदोलन! चक्क रस्त्यावरील खड्यात जेवण करून केला सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध
Parbhani News: परभणीच्या जिंतूर-येलदरी रस्त्यावरील खड्याच्या त्रासापासून संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आज एक अनोख्या पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
Parbhani News परभणी : परभणीच्या जिंतूर-येलदरी रस्त्यावर मागील काही दिवसांपासून मोठं मोठी खड्डे पडले आहेत. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने (Public Works Department) याकडे अक्षरक्ष: दुर्लक्ष करीत असल्याचा प्रकार घडला आहे. परिणामी, या त्रासापासून संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी एक अनोख्या पद्धतीने आंदोलन (Protest) करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. यात सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेधार्थ आज याच रस्त्यावर पडलेल्या खड्यात नागरिकांनी चक्क खड्ड्यात बसून जेवण करत सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध नोंदवला आहे.
चक्क खड्याजवळच जेवणाचा पंगतीचे आयोजन
जिंतूर येलदरी मार्गे विदर्भात जाण्यासाठी एकमेव मार्ग असल्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. शिवाय परीसरातील अनेक गावात जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करावा लागतो. मात्र मागील काही दिवसांपासून रस्त्यावर जागोजागी मोठं मोठी खड्डे पडली आहेत. रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता अशी अवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्यामुळे नेहमीच अपघात घडत आहेत. परिणामी अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. परंतु वेळोवेळी गावकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली.
मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. म्हणून यलदरी, शेवडी, माणकेश्वर, केहाळ,आंबरवाडी आदी गावातील नागरिकांनी यलदरी रस्त्यावर दीड हजार खड्डे पूर्ण झाल्या बदल शहरातील प्रमुख कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना खड्डे जेवणाचे निमंत्रण पत्रिका देऊन मोठ्या खड्याजवळ जेवणाचा पंगतीचे आयोजन केले होते. यावेळी परिसरातील नागरिकांनी निष्क्रिय सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध व्यक्त केला. दरम्यान, नागरिकांनी आज केलेल्या अनोखे आंदोलनामुळे सर्वत्र हा चर्चेचा विषय झाला होता.
इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या 5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार
राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनेचे सत्र थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. एकीकडे चिमुकल्यावरील लैगिक अत्याचारांच्या (Sexual assault) घटनेने राज्यसह देश हादरला असताना परभणीच्या सोनपेठ शहरामधून अशीच एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात एका इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या 5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार (Crime News) झाल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे.
हे प्रकरण उजेडात येताच सर्वत्र एकच खळबळ उडाली असून आता या प्रकरणामध्ये अज्ञात इसमावर पॉस्को आणि इतर कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आता या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी 8 पथकांची नियुक्ती केली आहे. शिवाय स्वतः पोलीस अधीक्षक या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या