एक्स्प्लोर
Advertisement
कोल्हापुरात उष्माघाताने एक हजार कोंबड्यांचा मृत्यू
कोल्हापूर : वाढत्या तापमानाचा फटका पशुधनालाही बसत आहे. कोल्हापुरात उष्माघाताने एक हजार ब्रॉयलर कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. आजरा तालुक्याजवळ असणाऱ्या पोळगाव येथील शेवाळे कुटुंबियांना याची झळ बसली.
आजरा तालुक्याचं तापमान 35 ते 36 अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत असायचं, मात्र मंगळवारी ते 40 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचलं. त्यामुळे शेडमध्ये असलेल्या साडे तीन हजार कोंबड्यांपैकी एक हजार कोंबड्या उष्माघाताला बळी पडल्या.
अचानक आलेल्या या संकटाने शेवाळे कुटुंबाला मोठी आर्थिक झळ बसली आहे. जवळपास अडीच ते तीन लाखांचं नुकसान झाल्याने शेवाळे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडलं आहे.
पशुधन विकास अधिकाऱ्यांनी मृत कोंबड्यांचं शवविच्छेदन केलं असता छातीकडील भाग उष्णतेने बॉईल झाल्यासारखा पांढरट पडला असल्याचं दिसून आलं. त्यामुळे उष्माघातानेच मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं.
वाढत्या तापमानामुळे सध्या पक्ष्यांची काळजी घेणं आवश्यक आहे. तापमान नियंत्रणासाठी फॉगर्स, पक्ष्यांना पिण्यासाठी थंड पाणी आणि खाद्याच्या वेळेत बदल करणं गरजेचं आहे, असं आवाहन पशुधन अधिकाऱ्यांनी केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
पुणे
निवडणूक
निवडणूक
Advertisement