Kolhapur Urban Bank : कोल्हापूर अर्बनमध्ये सत्तारुढ पॅनेलचा एकतर्फी विजय
Kolhapur Urban Bank : शतकोत्तर परंपरा लाभलेल्या दि कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी जुने पॅनेलचा एकतर्फी विजय झाला आहे. सत्ताधारी पॅनेलने 15 पैकी 15 जागा जिंकल्या.

Kolhapur Urban Bank : शतकोत्तर परंपरा लाभलेल्या दि कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी जुने पॅनेलचा एकतर्फी विजय झाला आहे. सत्ताधारी पॅनेलने 15 पैकी 15 जागा जिंकल्या. विरोधी पॅनलचे प्रमुख व विद्यमान संचालक उमेश निगडे, गीतादेवी जाधव यांचाही पराभव झाला. सत्ताधाऱ्यांनी सरासरी चार हजार मतांनी विजय मिळवला.
निवडणुकीत 48 टक्के मतदान झाल्याने मतदानाचा वाढीव टक्का कोणाच्या बाजूने झुकणार याकडे लक्ष लागले होते. मात्र, सभासदाने सत्ताधारी जुने पॅनेललाच पुन्हा एकदा पसंती दिली. पहिला फेरीपासून सत्ताधारी जुने पॅनल आघाडीवर राहिले. शेवटपर्यंत ही आघाडी कायम राहिली. सत्ताधारी शिंदे कणेरकर पॅनलने विद्यमान 9 संचालकांना पुन्हा रिंगणात उतरवले होते. विरोधात बँकेचे माजी अध्यक्ष उमेश निगडे यांनी राजर्षी शाहू भास्करराव जाधव पॅनेल या नावाने पॅनेलची स्थापना केली होती.
निवडणुकीच्या कालावधीत सत्ताधारी गटाने जोरदार प्रचार करताना वातावरण निर्मिती केली होती. सत्तारुढ गटाचे नेतृत्व माजी अध्यक्ष शिरीष कणेरकर यांनी केले. संयमाने प्रचार करत सभासदांना गेल्या काही वर्षात केलेल्या कामकाजाचे महत्त्व पटवून दिले. विरोधकांचे आक्षेप पद्धतशीरपणे खोडून काढत पुन्हा एकदा सभासदांचा विश्वास प्राप्त केला. निवडणुकीच्या कालावधीत सभासदांना प्रत्यक्ष भेटून सत्तारुढ आघाडीने सभासदाभिमुख कामकाज केल्याचे मतदारांसमोर मांडले. या निवडणुकीत 5 अपक्ष उमेदवार रिंगणात होते.
संचालक निवडणुकीत शिरीष कणेरकर, संभाजी जगदाळे, अॅड. रविंद्र धर्माधिकारी, राजन भोसले, नंदकिशोर मकोटे, जयसिंग माने, अभिजित मांगुरे, अॅड. प्रशांत शिंदे, मधुसूदन सावंत, अॅड. यशवंतराव साळोखे, काटकर गजानन (विमुक्त जाती / भटक्या जमाती अथवा विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी), संध्या घोटणे (महिला प्रतिनिधी ), सुनीता राऊत (महिला प्रतिनिधी ), भांबुरे शंकरराव (इतर मागासवर्ग प्रतिनिधी), नामदेवराव कांबळे (अनुसूचित जाती जमाती) आदि उमेदवार विजयी झाले आहेत.
सत्ताधारी जुने पॅनलचे विजयी उमेदवार व मिळालेली मते
- शिरीष कणेरकर 8815
- संभाजी जगदाळे 7756
- रविंद्र धर्माधिकारी 7637
- राजन भोसले 8166
- नंदकिशोर मकोटे 7503
- जयसिंग माने 8032
- अभिजीत मांगोरे 7955
- प्रशांत शिंदे 8216
- मधुसूदन सावंत 7701
- यशवंतराव साळोखे 7502
- विश्वास काटकर 8793
- संध्या घोटणे 8237
- सुनीता राऊत 8423
- नामदेव कांबळे 8521
- सुभाष भांबुरे 8939
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
