(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Anjali Damania on Ajit Pawar : अजित पवारांची गुलाबी यात्रा पाहिली, पक्षात 40 गाड्या वाटल्या, पैसा कुठून आला? अजितदादांना थेट सवाल
Anjali Damania on Ajit Pawar : नाना पटोलेंसारखा माणूस पाच लाख रुपये इन्कम दाखवतो. उद्धव ठाकरे एक-दोन हे खरं वाटेल का? अशी विचारणा सुद्धा त्यांनी केली.
Anjali Damania on Ajit Pawar : काही दिवसांपूर्वी अजित पवार (Ajit Pawar) यांची चिल्ली पिल्ली सूरज चव्हाण व अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी माझावर खालच्या दर्जाची टीका केली. दहा वर्षांपूर्वी 2014 मध्ये मी माझ्या प्रतिज्ञापत्रात एक कोटींहून अधिक इन्कम दाखवला आहे. यावर्षी मी इन्कम टॅक्स भरला आहे. महिन्याला 30 लाख आम्हाला मिळतात, मी यावेळी सुद्धा आरटीआय इन्कम भरला आहे. विद्वान सुरज चव्हाण यांना मला सांगायचं आहे की जे म्हणाले ते 27 कोटीतील दोन कोटी आम्ही भरले आहेत, असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी म्हटलं आहे. अंजली दमानिया म्हणाल्या की, पाच पासपोर्ट माझ्याकडे एकाच नव्याने आहेत. पाच आहेत म्हणजे ते विविध ठिकाणी गेल्याने पानं संपली आहेत. या 12 महिन्यांमध्ये 10 इंटरनॅशनल ट्रिप केल्या आहेत.
यांच्या विरोधात मी लढणार म्हणजे लढणार
अजित पवार यांची गुलाबी यात्रा पाहिली. पक्षामध्ये 40 गाड्या वाटल्या. हा पैसा कोठून आला? अशी विचारणा अंजली दमानिया यांनी केली. अंजली दमानिया पुढे म्हणाल्या की पवारांसोबत फारकत घेतल्यानंतर हा पैसा कुठून आला? तुमच्या आई बहिणीला रिचार्ज करणारी बाई म्हटलं तर चालेल का? अशी विचारणा सुद्धा त्यांनी केली. राज्याने भ्रष्टाचाराने वाट लावली असून पैसा खिरापतीसाठी वाटला जात असल्याची टीका सुद्धा अंजली दमानिया यांनी केली. लाडकी योजना माध्यमातून लोकांना पैसे मिळावेत, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, असे त्यांनी सांगितले. माझ्याकडे सर्व नेत्यांचे राजकीय डिटेल्स असून यांच्या विरोधात मी लढणार म्हणजे लढणार असा इशारा अंजली दमानी यांना दिला.
माझ्याकडे सर्व राजकीय नेत्यांचे डिटेल्स आहेत
आपल्या व्यवहारांबाबत बोलताना म्हणाल्या की, आम्ही प्रत्येक गोष्टीला पैसे भरतो. प्रत्येक गोष्टीचा हिशोब आहे. डिजिटलद्वारे आम्ही पैशांचे व्यवहार करतो. 65 देशांची यादी आहे ज्या ठिकाणी मी गेली आहे. माझ्याकडे सर्व राजकीय नेत्यांचे डिटेल्स आहेत. नागरिकांनी समजून घ्यावे हे बरोबर का तो बरोबर आहे. कोणी दादा ताई बरोबर नाही हे सर्व महाराष्ट्र लुटायला आल्याची टीका अंजली दमानिया यांनी केली. अजितदादा यांच्यासह सर्वांची चौकशी करावी. नाना पटोलेंसारखा माणूस पाच लाख रुपये इन्कम दाखवतो. उद्धव ठाकरे एक-दोन हे खरं वाटेल का? अशी विचारणा सुद्धा त्यांनी केली.
माझा महाराष्ट्र कुटुंबामध्ये जन्म झाला. गुजराती भाषिक व्यक्ती सोबत माझं लग्न झालं. माझं शिक्षण, पदव्या माझे डायग्नोस्टिक सेंटर होतं. मी काही वर्षांपूर्वी 2015 मध्ये प्रॅक्टिस बंद केली. माझी पतींकडे चार पदव्या असून ते सीए आहेत. देशातून 32 व्या नंबरने पास झाल्यानंतर नामांकित कंपनीमध्ये कामाला. आता ते जेम कंपनीमध्ये सीए आहेत, अशी माहिती अंजली दमानिया यांनी यावेळी दिली.
इतर महत्वाच्या बातम्या