एक्स्प्लोर

मुंबईहून अकोल्याला पायी जाताना जळगावमध्ये अपहरण, 13 वर्षीय मुलगी अमरावतीत सापडली!

मुंबईहून अकोल्याकडे पायी निघालेल्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीचं जळगावमध्ये अपहरण झालं होतं. आज सकाळी ही मुलगी अमरावतीमध्ये सापडली.

अमरावती : मुंबईहून अकोल्याकडे पायी जातान जळगावमध्ये अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी अमरावतीमध्ये सापडली आहे. या मुलीला अमरावतीजवळील मुंबई-नागपूर महामार्गावरील लोणी टाकळीजवळ सोडून आरोपीने तिथून पळ काढला. पोलीस आरोपीचा शोध घेत असून मुलगी सध्या लोणी पोलीस स्टेशनमध्ये आहे.

काय आहे प्रकरण? मुंबई इथल्या मुलुंड परिसरात मजुरी करुन आपला उदरनिर्वाह करणारं एक कुटुंब कधी पायी तर कधी मिळेल त्या वाहनाने अकोल्याला निघाले होतं. पायी जात असलेल्या या कुटुंबाला जळगावमधील नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दुचाकीस्वाराने लिफ्ट देण्याची तयारी दाखवली होती. ऐन दुपारच्या उन्हाची वेळ असल्याने संबंधित कुटुंबातील 17 वर्षांचा मुलगा आणि 13 वर्षीय मुलगी दुचाकीवर बसून पुढच्या प्रवासाला निघाली होती. काही किलोमीटर अंतरावर गेल्यावर तरुणाने मुलीच्या भावास पुढे पोलीस असल्याचा बहाणा करुन उतरण्यास सांगितले आणि पोलिसांची गाडी गेल्यावर पुन्हा गाडीवर बसून जाऊ, आम्ही पुढे थांबतो अस सांगितलं.

मुंबईहून अकोल्याला पायी निघालेल्या कुटुंबातील मुलीचं जळगावमध्ये अपहरण

मुलीच्या भावाने यावर विश्वास ठेवला आणि तो गाडीवरुन उतरुन पायी चालू लागला. मात्र बरंच अंतर पुढे गेल्यावरही आपली बहीण आणि लिफ्ट देणारा तरुण न दिसल्याने भावाने आपबिती आपल्या आई-वडिलांना सांगितली. घटनेचं गांभीर्य ओळखून कुटुंबाने संबंधित तरुणाविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार केली. यानंतर पोलिसांनी आरोपी आणि मुलीचा शोध घेत होते.

अमरावतीमध्ये मुलगी सापडली अखेर आज सकाळी अमरावतीमध्ये ही मुलगी सापडली. या आरोपीने आपल्या दुचाकीवरुन काल (19 मे) दुपारी अडीचच्या सुमारास या मुलीला जळगावहून पळवून नेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. आरोपीने तब्बल 270 किमीपर्यंत त्या मुलीला आणलं. मग तिला अमरावतीजवळील मुंबई-नागपूर महामार्गावरील लोणी टाकळीजवळ सोडून तिथून पळ काढाला. आज सकाळी अकराच्या सुमारास ही मुलगी रस्त्यावर फिरताना आढळली असताना पोलिसांनी तिला पोलीस ठाण्यात आणलं. पोलीस आता आरोपीचा शोध घेत आहेत.

या प्रकरणातील आरोपी हा वाशिम जिल्ह्यातील मालेगाव इथला असून गणेश बांगर असं त्याचं नाव आहे. याआधी या आरोपीवर तब्बल 10 विविध जिल्ह्याच्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहे. ज्यामध्ये मुंबई, वाशिम, अकोला, यवतमाळ अशा जिल्ह्यात गुन्हे दाखल आहे. जळगाव पोलीस अमरावतीच्या लोणी याठिकाणी आले असून थोड्याच वेळात त्या अपहरण झालेल्या मुलीला घेऊन जाणार आहे. सोबतच आरोपीचा शोध सुरू आहे.

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget