9th March Headlines : संत तुकाराम बीज, राज्याचा अर्थसंकल्प, मनसेचा वर्धापन दिन; आज दिवसभरात
9th March Headlines : राज्याचा आज अर्थसंकल्प सादर होणार आहे. तर, संत तुकाराम बीज निमित्ताने देहूत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 17 वा वर्धापन दिन आहे.
8th March Headlines : आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांच्या हा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ खाते आहे. त्यामुळे अर्थमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपला पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेता या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.
अहमदाबाद -
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत विविध मुद्यांवर चर्चा करणार आहेत. दोन्ही देशांचे पंतप्रधान भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात हजेरी लावण्याची शक्यता आहे.
मुंबई
- महाराष्ट्र राज्य वरिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक आणि कर्मचारी संघटनेनं आझाद मैदानावर आंदोलन सुरु केलंय. हे सर्व कर्मचारी प्राध्यापक 2001 नंतरच्या कायम विनाअनुदानित महाविद्यालयातील आहेत.
ठाणे
- 9 मार्च 2006 साली स्थापन झालेल्या मनसेला आज 17 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्त गडकरी रंगायथन मध्ये संध्याकाळी 6 वाजता राज ठाकरेंची सभा होणार आहे.
नाशिक
- ख्रिस्ती समाजावर होत असलेले अन्याय-अत्याचार, सातत्याने केले जाणारे धर्मांतरांचे आरोप, ख्रिस्ती संस्थांबाबत सापत्नभावांची वागणूक तसेच शासनाचे ख्रिस्ती समाजाबद्दलचे दुर्लक्षिततेचे धोरण याविरोधात ख्रिस्ती समाज बांधवातर्फे मूकमोर्चा काढण्यात येणार आहे.
पुणे
- संत तुकाराम महाराजांचा 375 वा बिजोत्सव, देहू येथे कार्यक्रमांचे आयोजन
- खासदार सुप्रिया सुळे या दौंड तालुक्यातील गाव भेटीच्या दौऱ्यावर असणार आहेत. दौंड तालुक्यातील विविध गावांना सुप्रिया सुळे भेट देतील.
छत्रपती संभाजीनगर
- औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर केल्याच्या निषेधार्थ सुरू असलेल्या साखळी आंदोलनाचा पाचवा दिवस. आज संध्याकाळी 7 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा भडकल गेट कॅण्डल मार्च काढणार आहेत.
सांगली
- गॅस दरवाढीच्या निषेधार्थ सांगलीतील मदन भाऊ पाटील युवा मंचाकडून स्मशानभूमी मध्ये गॅसचे दहन करण्यात येणार आहे, सकाळी 11 वाजता.
जळगाव
- कापूस दरासह विविध मागण्यांसाठी मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदार संघात बोडवड चौफुली ते तहसीलदार कार्यालयावर महाविकास आघाडीकडून जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
निर्णायक कसोटी सामना
India vs Australia 4th Test : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील अखेरचा सामना नऊ मार्च रोजी अहमदाबादमध्ये होत आहे. चार सामन्याच्या कसोटी मालिकेत भारताने 2-1 ने आघाडी घेतली आहे. आता निर्णायक कसोटी सामन्यात कोण बाजी मारणार? याकडे क्रीडा विश्वाचं लक्ष लागलेय. भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता आहे. केएस भरतच्या जागी ईशान किशन याला संधी मिळण्याची शक्यता आहे. तर उमेश यादव याच्या जागी मोहम्मद शामी संघात परतणार आहे.