8th March Headlines : जागतिक महिला दिन, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा आठवडा, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर; आज दिवसभरात...
8th March Headlines : आजपासून विधिमंडळ अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू होणार असून विरोधक आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत. जागतिक महिला दिनानिमित्ताने राज्यासह देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
8th March Headlines : आजपासून विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. विधिमंडळ आजही विरोधक शेतमालाला हमी भाव आणि इतर मुद्यांवर आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा आठवडा वादळी ठरण्याची चिन्ह आहेत. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान तीन दिवसाच्या भारत दौऱ्यावर असणार आहेत. त्यांच्या भारत दौऱ्याची सुरुवात गुजरातपासून होणार आहे. तर, जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.
मुंबई
- राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा आठवडा आजपासून सुरू होत आहे. राज्यात मागच्या दोन दिवसांपासून अवकाळीनं थैमान घातलंय. बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडलाय. सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत केली पाहिजे यासाठी विरोधी पक्ष आक्रमक होणार आहे. सकाळी पायऱ्यांवर आणि मग नंतर सभागृहात विरोधी पक्ष आक्रमक होणार असल्याची शक्यता आहे. कांदा, कोथिंबीर, मेथी यांनाही भाव नाही. अजूनही शेतकऱ्यांचा कांदा कमी दराने खरेदी केला जातोय. शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करण्यासाच्या मुद्यावरूनही विरोधी पक्ष सभागृहात आक्रमक होण्याची चिन्हं आहेत. महाराष्ट्राचे आर्थिक धोरण आज सभागृहामध्ये जाहीर केले जाईल. त्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती काय आहे यावरून स्पष्ट होईल.
- कसबा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर आज मुंबईत महाविकास आघाडीमधील नेत्यांची भेट घेणार आहे.
- मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पहिल्या एमसीए महिला लीगचं सकाळी 8.45 वाजता उद्घाटन होणार आहे.
- राज्य महिला आयोगाच्यावतीनं आयोजित महिला दिनानिमीत्त जागर स्त्रीत्वाचा, सन्मान कर्तृत्वाचा हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता बालगंधर्व रंगमदिर वांद्रे येथे होणार आहे.
- अँटिलिया स्फोटकं आणि मनसूख हिरेन हत्याकांड प्रकरणात माजी पोलीस अधिकारी सुनील मानेचा माफीचा साक्षीदार होण्याकरता विनंती केली आहे. सुनील मानेच्या अर्जावर आज तपास यंत्रणा आपलं उत्तर कोर्टात दाखल करण्याची शक्यता आहे.
- कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. तपास यंत्रणेकडून चालढकल सुरू असल्याचा पानसरे कुटुंबियांचा हायकोर्टात आरोप करण्यात आला आहे.
पुणे
- अदानी आणि केंद्र सरकारच्या विरोधात कॉंग्रेसचं सकाळी आंदोलन होणार आहे.
कोल्हापूर
- महिला दिनाच्या निमित्ताने स्वाभिमानी शेतकरी महिला आघाडीच्यावतीने इचलकरंजी इथं तिरडी मोर्चा काढण्यात येणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
त्रिपुरा
- त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदी माणिक साहा दुसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथविधीला उपस्थित राहणार आहेत.
गुजरात
- गांधीनगर - पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर असणार आहेत.
अहमदाबाद – ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बनीज आजपासून तीन दिवसीय भारत दौऱ्यावर असणार आहेत. दौऱ्याची सुरूवात गुजरातमधून करणार आहेत.