एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पालघर गडचिंचले साधू हत्त्या प्रकरणात 89 जणांना जामीन मंजूर, आतापर्यंत 194 जणांची जामिनावर मुक्तता
पालघर गडचिंचले साधू हत्त्या प्रकरणात आज विशेष न्यायालयाने 89 जणांचा जामीन मंजूर केला आहे.
पालघर : गडचिंचले साधू हत्त्याकांड प्रकरणी आज 89 जणांना जामीन मंजूर झाला आहे. ठाणे न्यायालयात ही सुनावणी होती. विशेष न्यायाधीश एस. बी. बहालकर यांच्या न्यायालयाने या आरोपींचा जामीन मंजूर केला आहे. आतापर्यंत या प्रकरणात 251 जणांना अटक करण्यात आली होती तर या अगोदर 105 जणांना जामीन मंजूर झाले आहेत. आज पुन्हा 89 जणांना जामीन मंजूर झाला असून या प्रकरणात आतापर्यंत एकूण 194 जणांची जामिनावर मुक्तता झाली आहे.
पालघर जिल्ह्यातील गडचिंचले साधू हत्या प्रकरणात तब्बल 251 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर आज ठाणे जिल्हा विशेष मॉब लिचिंग न्यायालयाने आणखी 89 आरोपींचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. यापूर्वी याच न्यायालयाने तब्बल 86 जणांची जामिनावर मुक्तता केलेली आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील गडचिंचले प्रकरणात आतापर्यंत जामिनावर सुटका झालेल्यांची संख्या 194 वर पोहोचली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये 12 आरोपी हे अल्पवयीन होते. तर न्यायालयाने यापूर्वीच हत्येत प्रमुख भूमिका असल्याचा ठपका ठेवत 36 आरोपींचा जमीन अर्ज फेटाळला आहे.
89 आरोपींना जामीन मंजूर
ठाणे जिल्हा विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. पी. बहालकर यांनी 89 आरोपींना जामीन दिला आहे. आरोपींच्या वतीने वकील अमृत अधिकारी यांनी न्यायालयात युक्तीवाद केला. पोलिसांनी निरपराध लोकांना अटक केली. त्यांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले होते, त्यामुळे त्यांची जामिनावर सुटका करावी, असा युक्तीवाद करण्यात आला. या झुंडबळी प्रकरणात तीन स्वतंत्र गुन्हे 16 एप्रिल, 2020 ला दाखल करण्यात आले होते.
काय आहे गडचिंचले प्रकरण?
16 एप्रिलला पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे चोर, दरोडेखोर असल्याच्या संशयातून जमावाने हल्ला करत दोन साधू व वाहनचालक अशा तिघांची हत्या केली होती. तिहेरी हत्याप्रकरण देशभर चर्चेचा मुद्दा बनला. हे संपूर्ण प्रकरण हाताळत असताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. त्यानंतर गडचिंचले तिहेरी हत्याकांडाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागातमार्फत करण्यात आला. याप्रकरणात आतापर्यंत कासा पोलीस ठाण्यातील 2 पोलीस अधिकारी व 3 कर्मचाऱ्यांचे निलंबन तसेच 35 कर्मचाऱ्यांची जिल्ह्यात अन्य ठिकाणी बदली करण्यात आली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 7 मे रोजी गडचिंचले येथे घटनास्थळाचा दौरा केल्यानंतर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. गडचिंचले हत्याकांड प्रकरणात कासा पोलीस ठाण्यात दाखल तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांत तीन स्वतंत्र दोषारोपपत्र गुन्हे अन्वेषण विभागाने न्यायालयात दाखल केले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement