एक्स्प्लोर
'स्वच्छ भारत मिशन'कडे दुर्लक्ष, आरंगाबादेत 8 जण निलंबित

औरंगाबाद : स्वच्छ भारत मिशन या केंद्र आणि राज्य सरकारच्या महत्वकांक्षी योजेनेच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याने 8 जणांना निलंबित करण्यात आलं आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. गंगापूर तालुक्यातील 4 ग्रामविकास अधिकारी आणि 4 ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आलं. वारंवार सूचना देऊनही या कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या आदेशांकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे 8 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. स्वच्छ भारत मिशन ही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरु केलेली केंद्र आणि राज्य सरकारची महत्वकांक्षी योजना आहे. शहरांसोबत ग्रामीण भागातील स्वच्छतेसाठीही राज्य सरकारकडून विविध योजना राबवण्यात येतात. मात्र अनेकदा स्थानिक पातळीवर त्याकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येतं. मात्र औरंगाबाद जिल्हा परिषदेने कर्मचाऱ्यांच्या निलंबानाची कारवाई करुन सर्वांना दणका दिला आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट
करमणूक























