एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विदर्भात भाजपच नंबर वन, 11 पैकी 7 नगराध्यक्ष भाजपचे!
मुंबई : विदर्भातील 11 नगरपालिकांमध्ये भाजपचे 7 नगराध्यक्ष निवडून आले आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यातच सात नगराध्यक्ष भाजपचे निवडून आले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी आठ जागांवर दावा केला होता. मात्र त्यांना अपेक्षेनुसार यश मिळालं नसलं तरी भाजपने अव्वल क्रमांक मिळवत मोठ्याप्रमाणात यश मिळवलं आहे.
या निवडणुकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सावनेरचे आमदार सुनील केदार यांना धक्का बसला आहे. पालकमंत्र्यांनी कामठीची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. यासाठी माजी मंत्री अॅड. सुलेख कुंभारे यांच्या बहुजन रिपब्लिकन एकता मंचसोबत आघाडी केली होती. यानंतरही पालकमंत्र्यांना अपेक्षित विजय मिळवता आला नाही.
रामटेक नगरपालिका : शिवसेनेचे माजी आमदार आशिष जयस्वाल यांचे रामटेक नगरपालिकेवर वर्चस्व होते. शिवसेनेने बिकेंद्र महाजनला उमेदवारी दिल्याने शिवसेनेच्या रमेश कारेमोरे यांची बंडखोरी केली. याचा फायदा भाजपच्या दिलीप देशमुख यांनी उचलला. कारेमोरे यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली.
एकूण 17 जागा
भाजप - 13
काँग्रेस - 02
शिवसेना - 02
नगराध्यक्ष - दिलीप देशमुख (भाजप)
खापा नगरपालिका : सावनेर तालुक्यातील खापामध्ये काँग्रेस नेते सुनील केदार यांना मोठा धक्का बसला आहे. भाजपने मोठं यश मिळवत काँग्रेसला धूळ चारली.
एकूण 17 जागा
भाजप - 15
काँग्रेस - 01
अपक्ष - 01
नगराध्यक्ष - प्रियंका मोहिते (भाजप)
कळमेश्वकर नगरपालिका : नितीन गडकरींच्या गृह तालुक्यात भाजप निर्विवाद यश मिळवू शकली नाही. नगराध्यक्षपदी भाजपच्या उमेदवार जिंकल्या, मात्र भाजप बहुमत नाही मिळवू शकले नाही.
एकूण 17 जागा
भाजप - 05
काँग्रेस - 08
शिवसेना - 02
राष्ट्रवादी - 02
नगराध्यक्ष - स्मृती इखार (भाजप)
सावनेर नगरपालिका : काँग्रेसला सावनेरमध्ये मोठा धक्का बसला. आमदार सुनील केदार त्यांच्याच होमपिचवर क्लीन बोल्ड झाले. नगराध्यक्ष आणि बहुमत दोन्ही भाजपच्या झोळीत गेले. त्यामुळे केदार यांच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसला आहे. फक्त सहा जागा काँग्रेसला जिंकता आल्या.
एकूण जागा 20
भाजप - 14
काँग्रेस - 06
नगराध्यक्ष - रेखा मोवाडे (भाजप)
उमरेड नगरपालिका : उमरेडमध्ये काँग्रेस नेते आणि माजी मंत्री राजेंद्र मुळक चित झाले. सत्तेत असलेल्या काँग्रेसला फक्त 6 जागा जिंकता आल्या आहेत.
एकूण जागा 25
भाजप-19
काँग्रेस-06
नगराध्यक्ष - विजयालक्ष्मी भदोरिया, भाजप
नरखेड नगरपालिका : नरखेड तालुक्यामत माजी मंत्री अनिल देशमुख यांचा दबदबा होता. पुतणे आणि भाजप आमदार डॉ.आशिष देशमुख यांना धक्का देत अनिल देशमुख पुन्हा नगरपालिकेत सक्रीय झाले. अनिल देशमुखांनी पुतण्याने केलेल्या पराभवाचा वचपा काढला. विशेष म्हणजे आशिष देशमुख यांच्या मेहुण्याने बंडखोरी करुन अपक्ष दावेदारी दाखल केली होती. इथे भाजपला खातंही उघडता आलं नाही. नगरविकास आघाडीचे अभिजित गुप्ता नगराध्यक्षपदी निवडून आले. तर राष्ट्रवादीला काठावरच बहुमत मिळालं आहे.
एकूण जागा 17
राष्ट्रवादी - 08
शिवसेना - 03
नगरविकास आघाडी - 06
नगराध्यक्ष अभिजित गुप्ता (अपक्ष -नगर विकास आघाडी)
काटोल नगरपालिका : काटोलमध्ये सुरुवातीपासूनच खिचडी होती. चरणसिंग ठाकूर यांनी नेहमीप्रमाणे आपला वेगळा गट स्थापन केला. विदर्भ माझा या नव्या पक्षाला त्यांनी खातं उघडून दिले. त्याखालोखाल शेकापने धडक मारली. काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला इथे फारसं यश मिळवता आलं नाही.
एकूण जागा 20
विदर्भ माझा - 18
शेकाप - 04
भाजप - 01
नगराध्यक्ष वैशाली ठाकूर (विदर्भ माझा)
मोहपा नगरपालिका : कळमेश्वर म्हणजेच गडकरी यांचा धापेवाडा गाव आहे. त्या कळमेश्वर तालुक्यातील नगरपरिषदेत आतापर्यंत काँग्रेसची सत्ता होती. भाजपने जोर लावला होता पण अपयश आला. काँग्रेस आमदार सुनील केदार यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसने पुन्हा यश मिळवले आहे.
एकूण जागा 17
काँग्रेस - 10
भाजप - 05
नगराध्यक्ष शोभा काऊटकर (काँग्रेस)
संबंधित बातम्या : नगरपालिका निकाल : विदर्भातील नगराध्यक्षांची यादी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement