5th March Headlines : उद्धव ठाकरे यांची आज रत्नागिरीत सभा, मुंबईत भाजप-शिवसेनेची आशिर्वाद यात्रा; आज दिवसभरात...
5th March Headlines : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज रत्नागिरीतील खेडमध्ये सभा होणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. जाणून घेऊयात आज दिवसभरात...
5th March Headlines : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज रत्नागिरीत सभा होणार आहे. ही सभा खेडमध्ये रामदास कदम यांच्या बालेकिल्ल्यात होणार आहे. यावेळी काहींचे पक्ष प्रवेश देखील होणार आहेत. तर, दुसरीकडे मुंबईत भाजप- आणि शिवसेना शिंदे गटाची आशिर्वाद यात्रा निघणार आहे. जाणून घ्या आज दिवसभरातील घटना...
रत्नगिरी
- खेडच्या गोळीबार मैदानात संध्याकाळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार. संध्याकाळी 5 वाजता उद्धव ठाकरेंची जाहीर सभा. राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांचाही ठाकरेंच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश. माजी मंत्री रामदास कदम यांचे निकटवर्तीय माजी बांधकाम सभापती विश्वासकाका कदमदेखील पक्षात प्रवेश करणार आहेत.
नागपूर
- आज उपराजधानी नागपूर ते राजधानी मुंबई एक पेन्शन मार्च निघणार आहे. जुनी पेन्शन या मुद्द्यावर नव्याने निवडून आलेले काँग्रेस आमदार सुधाकर अडबाले हे या मोर्चामध्ये सहभागी होणार.
- वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी मागच्या 13 दिवसापासून सुरु असलेले विदर्भात फिरत असलेले विदर्भ निर्माण यात्रा आज नागपूरात पोहचणार. एक यात्रा गडचिरोलीच्या कालेश्वर व एक यात्रा बुलढाण्याच्या सिंदखेडराजा येथून निघाल्या होत्या. दोन्ही एकत्र येऊन संविधान चौकात त्याचा समारोप होणार आहे.
मुंबई
- अयोध्या वरून आणलेल्या धनुष्यबाणासह भाजप शिवसेना - शिंदे गट करणार मुंबई पूर्व उपनगरात शक्ती प्रदर्शन. सकाळी 9 वाजता सहा हजार बाईकसह घाटकोपर अमृतनगर सर्कल ते मुलुंड अशी भव्य आशीर्वाद यात्रा काढण्यात येणार.
पुणे
- पुण्यात पहिल्यांदाच होत असलेल्या साधू-संत-महंत संमेलन व दर्शन सोहळ्याचे उद्घाटन. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.
- गॅस दरवाढीच्या विरोधात AAP आम आदमी पार्टीचं पुण्यातील बालगंधर्व चौकात सकाळी 10 वाजता आंदोलन करण्यात येणार
सातारा
- शरद पवार दौरा सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. रयत शिक्षण संस्थांच्या इमारतीचे शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
नवी मुंबई
- सचिन धर्माधिकारी यांना (डॉक्टरेट ऑफ लिटरेचर ) डी. लिट पदवी प्रदान सोहळा नवी मुंबईत होत आहे. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे संचालक सचिन धर्माधिकारी यांच्या पदवी प्रदान कार्यक्रम सकाळी 10 वाजता नवी मुंबईत पार पडत आहे. जगदीशप्रसाद झाबरमल टिब्रेवाल विद्यापीठ राजस्थान डी. लिट पदवी प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यातील मंत्री यांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न होणार आहे.
अमरावती
- आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीत येत आहेत. अमरावतीत 1 ते 5 मार्च दरम्यान कृषी विभागाकडून भव्य कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. आज या कृषी महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार आहे.
सांगली
- राज्यस्तरीय ओपन रायफल शुटिंग स्पर्धेचे आयोजन. स्वर्गीय वसंतदादा पाटील आणि शहिद अशोक कामटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ओपन रायफल शूटिंग स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे.
सोलापूर
- सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आजही सोलापूर शहरात आहेत. त्यांच्या उपस्थितीत आत्मा अंतर्गत कृषी महोत्सवचे उदघाटन होणार आहे.
परभणी
- माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त सोनार समाजाचा सामुहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. लोणीकरही राहणार उपस्थित
जळगाव
- जळगाव तालुक्यात वराड येथे राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ होणार आहे.