एक्स्प्लोर

lampi virus Pune: पुण्यात लंपी रोगावरील लस खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून 50 लाखाचा निधी मंजूर

लंपी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून औषधे, लस खरेदीसाठी 50 लाखाच्या खर्चासाठी मान्यता दिली आहे.

Lampi virus Pune:  लंपी रोगाचा प्रादुर्भाव lampi virus रोखण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त पुणे (Pune) आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पुणे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून औषधे आणि लस खरेदीसाठी प्रत्येकी 25 लाख याप्रमाणे 50 लाखाच्या खर्चासाठी मान्यता दिली आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव डॉ. राजेश देशमुख यांनी ही मान्यता दिली आहे.

लंपी रोगावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे युद्धपातळीवर उपाययोजना करण्यात येत आहेत. विशेषत: लसीकरणावर भर देण्यात आला आहे. लंपी रोगाचा संसर्ग झालेल्या पशुधनाला इतर जनावरांपासून वेगळे ठेवून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. या उपचारासाठी पुरेशी औषधे आणि लसमात्रादेखील उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या खर्चाला तातडीने मान्यता दिली आहे. 

लंपी नियंत्रणासाठी आवश्यकता असल्यास अधिकचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्र किंवा राज्य शासनाकडून लंपी आजारावरील लसीसाठी निधी उपलब्ध झाल्यास हा निधी प्राधान्याने औषधांसाठी वापरण्यात यावा, असंही मंजुरी आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

लसीकरणासाठी युद्धपातळीवर काम सुरु

जिल्ह्यात 12 तालुक्यातील 78 ठिकाणी पशुधनाला लंपीचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे. 306 जनावरांना लंपीचा संसर्ग झाला असून त्यापैकी आठ जनावरांचा मृत्यू झाला आहे आणि 177 सक्रिय असून 121 बरे झाले आहेत. हा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी आणि बाधित जनावरांवर औषधोपचार करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत. त्यासाठी 2 लाख 85 हजार 700 लसमात्रा उपलब्ध झाल्या आहेत. जिल्हा संनियंत्रण समितीच्या बैठकीतही याबाबत आढावा घेण्यात आला आहे.

290 पथके आणि 730 अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती

बाधित जनावरे आढळलेल्या गोठ्यापासून पाच किलोमीटर परिसरातील सर्व पशुधनाचे तातडीने लसीकरण करण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना देण्यात आले असून त्यानुसार हे काम करण्यात येत आहे. निगराणी क्षेत्रातील सुमारे 4 लाख 40 जनावरांचे लसीकरण करायचं असून त्यापैकी 1 लाख 55हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आलं आहे. बाधित जनावरे आढळलेल्या भागापासून 5 किलोमीटरच्या क्षेत्रातील सर्व पशुधनावर मोफत औषधोपचार केले जाणार आहेत. लसीकरणासाठी पशुसंवर्धन विभागाची एकूण 290 पथके नेमण्यात आले असून त्यासाठी 730 अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रिंग व्हॅक्सिनेशन 

लंपी संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लसीकरण पद्धतीला ‘रिंग व्हॅक्सिनेशन’ असे म्हणतात. यात बाधित जनावराचे ठिकाण किंवा गोठा केंद्र मानून 5 किलोमीटरच्या परिघाच्या भागातील लसीकरण आधी करण्यात येते आणि तेथून सुरूवात करीत बाधित भागाकडे जात जनावरांचे लसीकरण करण्यात येते. त्यामुळे संसर्गाची तीव्रता कमी करण्यास मदत होते असे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.शितलकुमार मुकणे यांनी सांगितले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
महार वतनातील जमीन म्हणजे काय, वारसदारांना विकता येते का; ब्रिटीशकालीन इतिहास काय सांगतो?
महार वतनातील जमीन म्हणजे काय, वारसदारांना विकता येते का; ब्रिटीशकालीन इतिहास काय सांगतो?
Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराजांचं ट्रोलर्संना सडेतोड उत्तर; लेकीच्या राजशाही साखरपुड्यावरून डिवचणाऱ्यांना स्पष्टच सांगितलं
इंदुरीकर महाराजांचं ट्रोलर्संना सडेतोड उत्तर; लेकीच्या राजशाही साखरपुड्यावरून डिवचणाऱ्यांना स्पष्टच सांगितलं
मोठी बातमी! असलं काहीही चुकीचं केलेलं मला चालणार नाही; पार्थ पवार जमीनप्रकरणावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! असलं काहीही चुकीचं केलेलं मला चालणार नाही; पार्थ पवार जमीनप्रकरणावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BJP's Power Play: 'मित्रपक्षांची कोंडी'! शिंदे-पवारांच्या बालेकिल्ल्यात भाजपची नवी रणनीती
Mumbai Local Updates : रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Ajit Pawar Land Scam: 'माझ्या नावाचा वापर करून कुणी चुकीचं करत असेल तर…'; Ajit Pawar यांचा थेट इशारा
Ajit Pawar Pune Land Deal: पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून अजित पवारांची राजीनाम्याची मागणी, चौकशी कोण करणार?
Parth pawar Land Deal: 'चौकशी होणारच', मुख्यमंत्री देवेंद्र् फडणवीसांचा चौकशीचे आदेश

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
महार वतनातील जमीन म्हणजे काय, वारसदारांना विकता येते का; ब्रिटीशकालीन इतिहास काय सांगतो?
महार वतनातील जमीन म्हणजे काय, वारसदारांना विकता येते का; ब्रिटीशकालीन इतिहास काय सांगतो?
Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराजांचं ट्रोलर्संना सडेतोड उत्तर; लेकीच्या राजशाही साखरपुड्यावरून डिवचणाऱ्यांना स्पष्टच सांगितलं
इंदुरीकर महाराजांचं ट्रोलर्संना सडेतोड उत्तर; लेकीच्या राजशाही साखरपुड्यावरून डिवचणाऱ्यांना स्पष्टच सांगितलं
मोठी बातमी! असलं काहीही चुकीचं केलेलं मला चालणार नाही; पार्थ पवार जमीनप्रकरणावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! असलं काहीही चुकीचं केलेलं मला चालणार नाही; पार्थ पवार जमीनप्रकरणावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Supriya Sule on Parth Pawar: पार्थ पवारांवर महार वतनाच्या 1800 कोटींच्या जमिनीवर 300 कोटीत डल्ला मारल्याचा आरोप; आत्या सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया आली
पार्थ पवारांवर महार वतनाच्या 1800 कोटींच्या जमिनीवर 300 कोटीत डल्ला मारल्याचा आरोप; आत्या सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया आली
आई-वडिलांवर कुऱ्हाडीने घाव घातला, नंतर स्वतःलाही संपवलं... एकाच दिवशी कुटुंब संपलं, बुलढाण्यातील थरार
आई-वडिलांवर कुऱ्हाडीने घाव घातला, नंतर स्वतःलाही संपवलं... एकाच दिवशी कुटुंब संपलं, बुलढाण्यातील थरार
Sangli News: थेट नगराध्यक्ष लढतीसाठी जयंत पाटलांकडून राज्यातील पहिला उमेदवार जाहीर; नगरपरिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले
थेट नगराध्यक्ष लढतीसाठी जयंत पाटलांकडून राज्यातील पहिला उमेदवार जाहीर; नगरपरिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले
Video: पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचं मौन; पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर न देताच निघून गेले
Video: पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचं मौन; पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर न देताच निघून गेले
Embed widget