एक्स्प्लोर
Advertisement
मंत्रालयाच्या 5 व्या मजल्यावरुन उडी, उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू
आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
मुंबई : मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. हर्षल सुरेश रावते असे या व्यक्तीचे नाव असून, त्यांचं वय 43 वर्षे आहे. आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
हर्षल रावते हे औरंगाबदमधील पैठणमधील असल्याचे त्यांच्या ओळखपत्रावरुन समजते आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणात पॅरा लिगल स्वयंसेवक असल्याचं ओळखपत्र त्यांच्याकडे आढळलं आहे. हर्षल रावते हे मुंबईत चेंबुरमध्ये राहत असल्याचे त्यांच्याकडील आधार कार्डवरुन समजते आहे.
या घटनेनंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील हे तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि पाहणी केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
परभणी
Advertisement