एक्स्प्लोर

हिंगणघाट जळीतकांड : घटनेनंतर 26 व्या दिवशी आरोपीविरोधात 426 पानांचं दोषारोपपत्र दाखल

हिंगणघाट जळीतकांडातील आरोपी विकेश नगराळे विरोधात न्यायालयात 426 पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय. घटना घडल्यानंतर 26 व्या दिवशी 426 पानांचं दोषारोपपत्र आरोपी विरुद्ध दाखल करण्यात आलंय.

वर्धा : हिंगणघाट जळीत कांडातील आरोपीविरोधात पोलिसांनी कोर्टात आरोपपत्र दाखल केलंय. हिंगणघाट इथं कॉलेजला जात असलेल्या प्राध्यापक युवतीवर पेट्रोल टाकून जाळण्यात आलं होतं. नागपूरच्या रुग्णालयात तिचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याला अटक केली. त्यानंतर प्रकरणाचा सर्व बाजुंनी तपास करत पुरावे गोळा करण्यात आले. शुक्रवारी घटनेपासून 26 व्या दिवशी 426 पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय. हिंगणघाट जळीतकांड | आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा एकतर्फी प्रेमातून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्यानंतर हिंगणघाटच्या निर्भयानं 7 दिवस मृत्यूशी कडवी झुंज दिली. मात्र, 10 फेब्रुवारीला पहाटे उपचारादरम्यान नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात तिची प्राणज्योत मालवली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात 302 या कलमाची वाढ केली आहे. घटनेप्रकरणी आरोपी विकेश नगराळे याच्यावर सुरवातीला कलम 307, 326(a)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर यामध्ये 302 या कलमाची वाढ करण्यात आली आहे. प्रकरणाचा लवकर तपास करून प्रकरणात चार्जशीट दाखल करण्याचा प्रयत्न असल्याचं पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी सांगितलं होतं. त्याप्रमाणे प्रकरणाचा सर्व बाजुंनी तपास करत कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय. BLOG : कायदे बदलून महिलांवरील अत्याचार थांबतील का? जळीतकांड ते दोषारोपपत्र कशा घडल्या घटना - 03 फेब्रुवारी सका 7.15 वा – पीडित मुलगी कॉलेजमधे जात असताना आरोपी विकेश नगराळे यानं हिंगणघाटमधे नंदोरी चौकात पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. ज्यामधे मुलगी 40 टक्के जळाली. 03 फेब्रुवारी सका 9 वा – प्रथमोपचारानंतर पीडितेला नागपुरच्या ऑरेंजसिटी रूग्णालयात दाखल केलं. 03 फेब्रुवारी सका 9.30 वा –एबीपी माझानं बातमी दाखवल्यानंतर सगळीकडे वणव्यासारखी बातमी पसरली आणि त्यानंतर समाजातून सर्वत्र निषेध आणि चीड व्यक्त करायला सुरुवात. 03 फेब्रुवारी सका 11.45 वा –आरोपी विकेश नगराळे याला नागपूर जिल्ह्यातील टाकळघाट परिसरातून ताब्यात घेतलं. 03 फेब्रुवारी दुपा 3 वा –हिंगणघाटमधे नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया. शहरात बंद करायला सुरूवात. 04 फेब्रुवारी सका 11 वा – ऑरेंज सिटी रूग्णालयाचं मेडिकल बुलेटिन –पीडितेची प्रकृती चिंताजनक. कृत्रिम श्वासोच्छवास सुरू. 04 फेब्रुवारी दुपा 5 वा - गृहमंत्री अनिल देशमुख हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील पीडित मुलीच्या उपचारासाठी स्पेशालिस्ट डॉक्टरांसह नागपूरकडे रवाना. पीडितेच्या परिवाराची भेट घेतली. 05 फेब्रुवारी सका 9.30 वा मेडिकल बुलेटिनमध्ये माहिती. मुलीनं हात हलवून आईशी इशाऱ्याद्वारे संवाद साधला. प्रकृती मात्र चिंताजनक. 06 फेब्रुवारी –हिंगणघाटमधील घटनेच्या निषेधार्थ वर्धा बंदचं आवाहन. 06 फेब्रुवारी सका 11.30 वा –पीडितेचं मेडिकल बुलेटिन –प्रकृती स्थिर मात्र शरीरात जंतुसंसर्ग पसरायला सुरुवात झाल्यानं डॉक्टर अधिक सतर्क. 07 फेब्रुवारी दुपा 12 वा –पीडितेच्या मेडिकल बुलेटिनमधे माहिती. आतापर्यंत तीन ऑपरेशन्स केले असले तरी परिस्थिती गंभीरच. 08 फेब्रुवारी सका 6 वा –हिंगणघाट प्रकरणातल्या आरोपीला पहाटेच पोलिसांनी न्यायालयात हजर केलं. 08 फेब्रुवारी संध्या 6 वा –मेडिकल बुलेटिन अपडेट –पीडितेला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं. परिस्थिती गंभीर. 09 फेब्रुवारी दुपा 1 वा –पीडितेचं मेडिकल बुलेटिन –पीडितेचं ऑपरेशन करुन तिच्या शरीरातील जळालेली त्वचा काढली गेली. 10 फेब्रुवारी सका 6.55 वा –तीन वेळा हृदयघात होऊन हृदय बंद पडलं. पीडितेचा नागपूरच्या ऑरेंजसिटी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू. 10 फेब्रुवारी - पीडितेच्या मृत्यूनंतर पोलिसांनी या प्रकरणात 302 या कलमाची वाढ केली. घटनेप्रकरणी आरोपी विकेश नगराळे याच्यावर सुरुवातीला कलम 307, 326(a)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 28 फेब्रुवारी - घटनेपासून 26 व्या दिवशी 426 पानांचं दोषारोपपत्र दाखल. Hinganghat Accused | हिंगणघाट जळीतकांडातील आरोपीने तुरुंगात ब्लॅंकेटच्या चिंधीनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget