एक्स्प्लोर

हिंगणघाट जळीतकांड | आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाचा आरोपी विकेश नगराळे याने नागपूर कारागृहात आतम्हत्येचा प्रयत्न केल्याचं वृत्तं आहे. विकेश ने ब्लॅंकेटच्या चिंधी ने गळफास लावण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.

नागपूर : पंधरवड्यापूर्वी हिंगणघाट येथे प्राध्यापिकेला जिवंत जाळून ठार मारणारा मारेकरी विकेश उर्फ विक्की नगराळे याने बुधवारी नागपूर कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे. कारागृह प्रशासनाने मात्र यास नकार दिला असून या अफवा असल्याचे सांगितले आहे. विकेश नागपूर मध्यवर्ती कारागृहातील विशेष बराकीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, थंडीपासून बचाव करण्यासाठी विकेशला ब्लँकेट देण्यात आले आहे. बुधवारी दुपारी त्याने हे ब्लँकेट फाडले. त्याची एक चिंधी बराकीतील गजाला बांधली आणि ती गळ्यात अडकवून फास लावण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार तिथे तैनात असलेल्या सुरक्षारक्षकाच्या लक्षात आला. त्याने वेळीच धाव घेत विकेशच्या गळ्याभोवतीचा फास ढिला केला. यानंतर त्याला कारागृहातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे, असे कळते. या घटनेबाबत कारागृह प्रशासनाशी संपर्क साधला असता, विकेशने आत्महत्येचा कुठलाही प्रयत्न केला नाही. त्याच्या आत्महत्येचे वृत्त चुकीचे असल्याचा दावा केला. आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळेची आज (19 फेब्रुवारी) न्यायालयीन कोठडीची मुदत संपत आहे.  व्हिडिओ कॉन्फेरद्वारे न्यायालयात पेश की प्रत्यक्ष आणणार, हे अजून सांगितले नाही. मात्र  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीची व्हिडीओ कॉन्फरन्सने पेशी होण्याची शक्यता आहे. Hinganghat Nirbahya | मी हिंगणघाटची लेक बोलतेय! जाता जाता काय म्हणाली निर्भया? स्पेशल रिपोर्ट   विकेशने 3 फेब्रुवारीला कॉलेजमध्ये जात असताना पीडितेवर आरोपी विकेश नागराळेनं पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यात पीडित शिक्षिकेचा चेहरा पूर्णपणे जळाला होता. श्वसननलिकेला देखील मोठी इजा झाली होती. डॉक्टरांनी वेळोवेळी शस्त्रक्रिया करुन पीडितेला वाचवण्याचा पुरेपर प्रयत्न केला होता. मात्र तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. १० फेब्रुवारी रोजी तिचा मृत्यू झाला. या घटनेने महाराष्ट्र हादरला. पीडितेच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर दारोडाच्या ग्रामस्थांचा आक्रोश अनावर झाला होता. आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली जात आहे. घटनेप्रकरणी आरोपी विकेश नगराळे याच्यावर सुरवातीला कलम 307, 326 (a) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर यामध्ये 302 या कलमाची वाढ करण्यात आली आहे. प्रकरणाचा लवकर तपास करून प्रकरणात चार्जशीट दाखल करण्याचा प्रयत्न असल्याचं पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी सांगितलं आहे. तसेच हिंगणघाट जळीत हत्याप्रकरणाच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित बातम्या : हिंगणघाट जळीत खटल्यासाठी विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती Hinganghat Women Ablaze | हिंगणघाट जळीतकांडातील तरुणीचा मृत्यू

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Embed widget