एक्स्प्लोर
नियुक्ती नसतानाही आर्टिलरी सेंटरमध्ये प्रशिक्षण, पाच जणांना अटक
नाशिक : नियुक्ती झाली नसतानाही नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. बलवीर गुजर (वय 22 वर्ष), सचिन किशनसिंह (वय 19 वर्ष), तेजपाल चोप्रा (वय 19 वर्ष), सुरेश महंतो (वय 21 वर्ष) अशी अटक केलेल्या चौघांची नावं आहेत. त्यांची रवानगी नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली आहे.E हे चारही जण मूळचे राजस्थानमधील आहे.
दिल्लीमधील मिलिटरी ट्रेनिंग घेतल्याची बनावट कागदपत्रे या चारही जणांनी नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये सादर केली. धक्कादायक म्हणजे कागदपत्रांची पडताळणी न करताच त्यांना 15 दिवस प्रशिक्षण देण्यात आलं.
या चौघांबाबत समजल्यानंतर आर्टिलरी सेंटरने उपनगर पोलिस स्टेशनमध्ये 11 जुलै रोजीच गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु ही माहिती गुप्त ठेवण्यात आली होती. अखेर या प्रकरणातील सूत्रधार आणि 105 राजपुताना रायफलचा शिपाई गिरीराज घनश्याम चौहान सिंहला काल दिल्लीत अटक करण्यात आली. तर चौघांना आधीच जेरबंद केलं होत.
नाशिकमधील आर्टिलरी सेंटर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. याठिकाणी सर्वसामान्यांना फिरण्यास किंवा फोटो काढण्यास बंदी आहे. मात्र तरीही हे चारही बोगस कागदपत्रांच्या आधारावर आर्टिलरीमध्ये प्रवेश मिळवतात आणि 15 दिवस प्रशिक्षण घेतात, ही बाब निश्चितच धक्कादायक आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement