एक्स्प्लोर

Corona Update | राज्यात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे आणखी 3 रुग्ण; पिंपरी- चिंचवडमध्ये दहशत

कोरोना्च्या नव्या रुग्णांचा आकडा काहीसा नियंत्रणात आल्याचं वृत्त असतानाच या विषाणूच्या नव्या प्रकाराच्या संसर्गानं आरोग्य यंत्रणांवरील तणाव आणखी वाढवला आहे.

Corona Update युकेच्या कोरोना व्हायरस व्हॅरिएंट अर्थात कोरोनाच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झालेले आणखी 3 पॉझिटीव्ह रुग्ण महाराष्ट्रात असल्याचं आढळून आले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच ट्विट करत यासंदर्भातील माहिती दिली. हे तिन्ही प्रवासी रुग्ण पिंपरी - चिंचवडचे असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळं आता पिंपरी- चिंचवड भागात दहशतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.

'ब्रिटनमधील नवीन कोरोना स्ट्रेनचे राज्यात आणखी 3 प्रवाशी आढळले. तिनही प्रवाशी पिंपरी चिंचवडचे असून नव्या कोरोना स्ट्रेनचे राज्यात आता एकूण 11 प्रवाशी झाले आहेत', असं ट्विट टोपे यांनी केलं.

दरम्यान आतापर्यंत राज्यात ब्रिटनमधील कोरोना व्हायरच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झालेल्यांची रुग्णसंख्या 11वर पोहोचली असतानाच त्यातील 2 रुग्णांना रुग्णालयातून रजा देण्यात आली आहे. यामध्ये मुंबई आणि पुण्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार नव्या स्ट्रेनच्या कोरोनाचा संसर्ग झालेले 11 रुग्ण हे असिम्प्टमॅटिक आहेत. अर्थात या रुग्णंमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून आलेली नाहीत.

आंतरराष्ट्रीय प्रवास करुन आलेल्या प्रवाशांच्या चाचण्यांना राज्यात वेग....

महाराष्ट्रात आतापर्यंत आंतरराष्ट्रीय प्रवास करुन आलेल्या जवळपास 4,858 प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. युकेमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची दहशत पसरलेली असतानाच सावधगिरी म्हणून राज्यात हे पाऊल उचलण्यात आलं आहे. या प्रवाशांपैकी 1,211 जणांना आतापर्यंत त्यांनी अत्यावश्यक अशा संस्तात्मक विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केला आहे.

 राज्यात कोरोना लसीच्या ड्राय रनची लगबग

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आज म्हणजेच 8 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील 30 जिल्हे आणि 25 महापालिका क्षेत्रांमध्ये आज कोरोना लसीकरणाचं ड्राय रन केलं जाणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या माहितीनुसार प्रत्येक जिल्ह्यातील तीन आरोग्य केंद्र आणि मनपातील एका आरोग्य केंद्रावर ड्राय रन केलं जाईल. यापूर्वी 2 जानेवारी रोजी पुणे, नंदुरबार, जालन आणि नागपूर जिल्ह्यासह नागपूर मनपा आणि पिंपरी चिंचवड महापालिकांमध्ये ड्राय रन करण्यात आलं होतं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramtek Bungalow : रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
Horoscope Today 25 December 2024 : आज नाताळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज नाताळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Kokan Refinary : कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी
शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 25 December 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्ससकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 25 December 2024  एबीपी माझा  SuperfastMajha Gaon Majha Jilha at 630AM 25 December 2024 माझा गाव, माझा जिल्हाABP Majha Marathi News Headlines 630AM TOP 630 AM 25 December 2024 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramtek Bungalow : रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
Horoscope Today 25 December 2024 : आज नाताळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज नाताळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Kokan Refinary : कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी
शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
मंत्रिपदाची शपथ घेतली, पदभार स्वीकारला; संजय सावकारेंनी दालनात येताच अगोदर पूजा घातली
मंत्रिपदाची शपथ घेतली, पदभार स्वीकारला; संजय सावकारेंनी दालनात येताच अगोदर पूजा घातली
IAS Transfer List : फडणवीस सरकारकडून राज्यातील वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर, मुंबई बेस्टमध्ये खांदेपालट
फडणवीस सरकारकडून राज्यातील वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर, मुंबई बेस्टमध्ये खांदेपालट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स; 24 डिसेंबर 2024  मंगळवार; एका क्लिकवर सर्वच घडामोडी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स; 24 डिसेंबर 2024 मंगळवार; एका क्लिकवर सर्वच घडामोडी
Embed widget