एक्स्प्लोर
पिंपरीत एसटी-कंटेनरची समोरासमोर धडक, तीन मृत्यूमुखी
पिंपरी चिंचवड : चाकण-तळेगाव रोडवर माळवाडीजवळ एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून 15 जखमी आहेत.
एसटी महामंडळाची शिरुर-कुर्ला ही बस कुर्ला येथे जात होती. त्यावेळी समोरुन येणाऱ्या कंटेनरची आणि बसची समोरासमोर धडक झाली. आज दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात झाला.
या अपघातात 15 जण जखमी झाले असून त्यांच्यावर पायोनीर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर अपघातातील मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. घटनास्थळी मदतकार्य सुरु आहे.
दरम्यान, अपघातानंतर वाहतूक कोंडी झाली असून दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement