(Source: ECI/ABP News/ABP Majha)
28 February Headlines : विधिमंडळ अधिवेशनाचा दुसरा दिवस, सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टात सुनावणी; आज दिवसभरात
28 February Headlines : राज्यासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. सुप्रीम कोर्टात घटनापीठासमोर आज सत्तासंघर्ष प्रकरणी सुनावणी होणार आहे. तर, दुसरीकडे आज विधिमंडळ अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे.
28 February Headlines : राज्याचं अर्थसंकल्पीय विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे. आज दुसऱ्या दिवशी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना देशद्रोही म्हटल्याने विरोधक आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. तर, दुसरीकडे सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षाबाबत सुनावणी होणार आहे. सलग तीन दिवस ही सुनावणी सुरू राहणार आहे.
दिल्ली
- महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. आज ठाकरे गटाकडून उर्वरित युक्तिवाद होणार असून त्यानंतर शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करण्याची शक्यता आहे. आजपासून पुढचे सलग तीन दिवस खंडपीठासमोर सुनावणी पार पडणार आहे. आज ठाकरे गटाचे वकिल देवदत्त कामत बाजू मांडणार आहे. त्यानंतर शिंदे गटाच्यावतीने जेष्ठ वकिल हरिश साळवे बाजू मांडतील.
मुंबई
- राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. विविध मुद्यांवरून दोन्ही सभागृहात विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
- भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री संबोधित करणार आहेत.
- एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आजपासून आमदार गोपाचंद पडळकर यांची सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेचे आझाद मैदानावर आत्मक्लेश आंदोलन करणार आहे.
- सरकारने संपाची दखल न घेतल्यामुळे संतप्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे उद्यापासून आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन करणार आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने गेली साडेपाच वर्षे तर केंद्र शासनाने गेली साडेचार वर्षे मानधनात कोणतीही वाढ दिलेली नाही.
- नवाब मलिक यांच्या जामिनावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. वैद्यकीय कारणास्तव मलिकांच्या जामिनावर तातडीनं सुनावणी घेणं हायकोर्टानं मान्य केले आहे.
नाशिक
- युवासेना अध्यक्ष खासदार श्रीकांत शिंदे ( शिवसेना- शिंदे गट) नाशिक दौऱ्यावर येणार आहेत.
- मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे आजपासून दोन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत.
- संजय राऊत हे देखील सोमवारपासून नाशिक दौऱ्यावर आहेत.
अहमदनगर
- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर असणार आहेत.
- ठाकरे गटाचे उपनेते विनोद घोसाळकर, विजय कदम यांच्या उपस्थितीत माऊली सभागृहात "शिवगर्जना" कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे.
बीड
- शिवगर्जना अभियानासाठी ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर, अनिल कदम, अंकित प्रभू यांचा माजलगाव दौरा.
चंद्रपूर
- शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाकडून सध्या शिवगर्जना अभियान सुरू आहे. शिवसेनेचे माजी खासदार आणि नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर शहर, वरोरामध्ये शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन
भंडारा
- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) भंडारा विधानसभा पदाधिकारी व कार्यकर्ता शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत हे मार्गदर्शन करणार आहे.