![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्ह्यात 28 मृत्युमुखी, सोलापुरात सर्वाधिक बळी!
परतीच्या पावसामुळे सोलापूर, सांगली, पुणे आणि साताऱ्यात आतापर्यंत 28 जणांचा मृत्यू झाला असून 1 जण बेपत्ता आहे. याशिवाय जवळपास 30 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
![पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्ह्यात 28 मृत्युमुखी, सोलापुरात सर्वाधिक बळी! 28 dead due to Heavy rain in Solapur, Satara, Sangli and Pune; over 20,000 evacuated पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्ह्यात 28 मृत्युमुखी, सोलापुरात सर्वाधिक बळी!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/16180251/Rain.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सोलापूर : परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह मुंबई, कोकणाला जोरदार झोडपलं. हाताशी आलेलं पीक पाण्याखाली गेलं. पावसामुळे आर्थिक नुकसान झालंच पण सोबतच मोठी जीवितहानी देखील झाली. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, पुणे आणि सातारा या चार जिल्ह्यात एकूण 28 जणांचा मृत्यू झाला आहे असून एक जण बेपत्ता आहे.
आतापर्यंत जवळपास 29 हजार 292 नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं आहे. यात पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या सोलापूर जिल्ह्यातील 17 हजार नागरिकांचा समावेश आहे. तर 57 हजार 354 हेक्टर क्षेत्रातील पीक जमीनदोस्त झालं आहे. याशिवाय 2319 घरांची पडझड किंवा मोठं नुकसान झाल्याचं समोर आलं. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापुरात 513 जनावरं नदीला आलेल्या पुरात वाहून गेली आहेत.
![पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्ह्यात 28 मृत्युमुखी, सोलापुरात सर्वाधिक बळी!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/16175431/Western-Maharashtra-Death-Toll.jpg)
सांगलीत पावसाचे 9 बळी सांगली जिल्ह्यात परतीच्या पावसात पूर्व भागातील नद्याच्या पुलावरुन आतापर्यंत 9 जण वाहून गेले आहेत. यातील सहा जणांचे मृतदेह सापडले तर तीन जणांचा शोध सुरु आहे. तर महापालिका क्षेत्रातील 300 हून अधिक लोकांचं काल स्थलांतर करण्यात आलं.
याशिवाय पुण्यात पावसामुळे चार जणांचा मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता आहे. तर साताऱ्यात एकाच बळी गेला आहे.
Maharashtra Flood | परतीच्या पावसाचं 'मृत्यूतांडव'महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)