27 March Headlines : संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही गोंधळाची शक्यता, मुश्रीफांच्या जामीन अर्जावर न्यायालयात युक्तिवाद
27 March Headlines : संसदेच्या दोन्ही सभागृहात आज सुद्धा गोंधळ सुरू रहाण्याची शक्यता आहे. राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी काँग्रेसचे खासदार आज संसदेत काळे कपडे किंवा काळ्या फिती लावून जाणार आहेत.
27 March Headlines : संसदेच्या दोन्ही सभागृहात आज सुद्धा गोंधळ सुरू रहाण्याची शक्यता आहे. भाजप खासदारांनी लोकसभा आणि राज्यभसेच्या सदस्यांसाठी व्हीप जारी केला आहे. तसेच राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी काँग्रेसचे खासदार आज संसदेत काळे कपडे किंवा काळ्या फिती लावून जाणार आहेत.
हसन मुश्रीफ यांच्या जामीन अर्जावर न्यायालयात युक्तिवाद होणार
मुंबई – हसन मुश्रीफ, त्यांची तिन्ही मुलं आणि सीएच्या जामीन अर्जावर सत्र न्यायालयात युक्तिवाद होईल. ईडीनं दाखल केलेल्या प्रकरणात अटक टाळण्यासाठी मुश्रीफ प्रयत्नशील आहेत. हसन मुश्रीफांना हायकोर्टानं दिलेलं अटकेपासूनचं संरक्षण या आठवड्यात संपतेय. त्यामुळे या याचिकेवर लवकरच निकाल अपेक्षित आहे.
राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी आजपासून सुरू
कोल्हापूर – राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी खऱ्या अर्थाने आजपासून सुरू होणार आहे. विरोधी आघाडीचे उमेदवार आज शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार आहेत. काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली विरोधी आघाडी आपली मोट बांधत आहे. त्यामुळे राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सतेज पाटील विरुद्ध महादेवराव महाडिक असा पारंपारिक सामना पाहायला मिळणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून राजारामच्या निवडणुकीकडे पाहिले जाते.
शिवेंद्रराजे भोसले यांची आज पत्रकार परिषद
सातारा – उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप गेल्या काही दिवसांमध्ये केलेले आहेत. आमदार शिवेंद्रराजे भोसले हे मुंबईहून साताऱ्यात येणार आहेत. आज ते उदयनराजे भोसले यांच्या आरोपांवर उत्तर देणार आहेत, सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद होणार आहे.
पुणे आणि भंडाऱ्यात राहुल गांधीच्या समर्थनात आंदोलन
पुणे – राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसकडून पुण्यातील स्वारगेट चौकात सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सत्याग्रह.
भंडारा – जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ आणि मोदी - अदाणी महाघोटाळा पर्दाफाश रॅलीचं आयोजन करण्यात आलीये. भंडारा शहरातील हुतात्मा स्मारक इथून दुपारी 2 वाजता निघणारी ही रॅली जिल्हाधिकारी चौकातील त्रिमूर्ती चौकापर्यंत काढण्यात येणार आहे.
- नदीपात्रात राबविण्यात येणार असलेल्या नदी सुधार योजनेंतर्गत सहा हजार झाडे तोडण्यात येणार असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीकडून आंदोलन, सकाळी 10.30 वाजता.
- विज दरवाढीविरोधात आम आदमी पक्षाकडून पुण्यातील महावितरण कार्यालयासमोर आंदोलन, दुपारी 12 वाजता.
अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर
बारामती – विरोधी पक्ष नेते अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. दुपारी 3 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे कार्यकर्ता मेळाव्यात संबोधित करणार आहेत.
उपमख्यमंत्री फडणवीस आज नवी मुंबई दौऱ्यावर
नवी मुंबई – उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नवी मुंबई दौऱ्यावर आहेत. औद्योगीक प्रशिक्षण संस्था पनवेल येथे राज्यपाल रमेश बैस यांच्यासोबत कार्यक्रमाला उपस्थिती. सकाळी 10.45 मिनीटांनी हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री पुन्हा हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना होतील.