एक्स्प्लोर

26 January In History : आजच्याच दिवशी देशाची राज्यघटना लागू झाली, डॉ.राजेंद्र प्रसाद देशाच्या पहिल्या राष्ट्रपतीपदी विराजमान; इतिहासात आज

On This Day In History :  आजच्याच दिवशी भारतीय राज्यघटना लागू झाली. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले. परंतु 26 जानेवारी 1950 रोजी भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. 

On This Day In History :   वैविध्यपूर्ण धर्म, श्रद्धा आणि संस्कृतींचा देश असलेल्या भारतात दररोज काही ना काही सण साजरे केले जातात. आपल्या देशात प्रत्येक धर्मात सण साजरे करण्याची परंपरा आहे, परंतु काही सण असे आहेत जे प्रत्येक देशवासीयांसाठी महत्त्वाचे आहेत आणि ते देशभर आदराने आणि आपुलकीने साजरे केले जातात. 26 जानेवारी हा देखील असाच एक दिवस आहे. जो देशाचा राष्ट्रीय सण आहे. देशातील प्रत्येक नागरिक मग तो कोणत्याही धर्माचा, जातीचा किंवा पंथाचा असो, हा दिवस संपूर्ण देशभक्तीने साजरा करतो. इतिहासाबद्दल बोलायचे झाले तर आजच्याच दिवशी भारतीय राज्यघटना लागू झाली. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले. परंतु 26 जानेवारी 1950 रोजी भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. 

1930: ब्रिटीश राजवटीत भारतात प्रथमच स्वराज दिन साजरा करण्यात आला

94 वर्षांपूर्वी याच दिवशी ब्रिटीश राजवटीत भारताने पूर्ण स्वातंत्र्याची प्रतिज्ञा घेतली होती. 26 जानेवारी 1929 रोजी लाहोर अधिवेशनात जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यसैनिकांनी ही शपथ घेतली. काँग्रेसशी संबंधित या नेत्यांनी ब्रिटिश राजवटीला पूर्ण स्वातंत्र्याची शपथ घेऊन एका वर्षात सत्ता सोडण्याचा इशारा दिला होता. या तारखेपासून बरोबर 21 वर्षे म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली आणि आपला देश लोकशाही प्रजासत्ताक बनला. तत्पूर्वी, 26 जानेवारी 1930 रोजी देशात प्रथमच पूर्ण स्वराज दिन किंवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. पुढील 18 वर्षे या दिवशी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. त्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 हा दिवस अधिकृतपणे स्वातंत्र्यदिन म्हणून घोषित करण्यात आला.

1950: सी. गोपालाचारी यांनी भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरलचे पद सोडले आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी देशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारले  (Rajendra Prasad)

संविधान सभेने 1950 मध्ये डॉ. राजेंद्र प्रसाद (Rajendra Prasad) यांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली. त्यांनी 1952 मध्ये पहिली आणि 1957 मध्ये दुसरी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली. राजेंद्र प्रसाद मे 1962 पर्यंत भारताचे राष्ट्रपती राहिले. त्यांचा कार्यकाळ सर्व राष्ट्रपतींमध्ये सर्वात मोठा आहे. 

2001: गुजरातमधील कच्छ भागात झालेल्या मोठ्या भूकंपात सुमारे 30 हजार लोकांचा मृत्यू (Gujarat Kutch Earthquake)

जानेवारी 2001 मध्ये गुजरात मोठा भूकंप झाला. ज्यामध्ये हजारो लोक मारले गेले आणि लाखो घरांचे नुकसान झाले. 26 जानेवारी 2001 रोजी भूज, गुजरातमध्ये 7.7 तीव्रतेचा भूकंप झाला. गुजरातमध्ये 2001 मध्ये आलेला भूकंप खूपच विनाशकारी होता. या भूकंपामुळे कच्छ आणि भूजमध्ये 30 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. याशिवाय या भूकंपामुळे दीड लाखांहून अधिक लोक जखमी झाले असून सुमारे चार लाख घरे उद्ध्वस्त झाली आहेत.

2015  : महान व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांची पुण्यतिथी (R K Laxman)

ख्यातनाम व्यंगचित्रकार आणि ‘कॉमन मॅन’ म्हणून परिचीत असलेले आर के लक्ष्मण यांची आज पुण्यतिथी आहे. आर के लक्ष्मण हे 'कॉमन मॅन'च्या माध्यमातून घराघरात पोहोचले. कॉमन मॅन, मालगुडी डेज, एशिनन पेंट्समधील गट्टू अशी अजरामर कार्टून्स आर के लक्ष्मण यांनी रेखाटली. लक्ष्मण यांचं ‘कॉमन मॅन’ हे कार्टून अनेक दशक चर्चेत राहिलं. ‘कॉमन मॅन’च्या माध्यमातून त्यांनी समाजातील विविध घडामोडींवर भाष्य केल्याने, जनतेनेही ते उचलून धरलं. रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण (आर. के. लक्ष्मण) यांचा जन्म 24 ऑक्टोबर 1921 रोजी झाला होता. ‘कॉमन मॅन’च्या माध्यमातून जगभरात त्यांची नोंद घेतली गेली. आर के लक्ष्मण यांची 1950 पासून सुरू केलेली कार्टून कला गेल्या काही वर्षांपर्यंत सुरुच होती. उतारवयातही त्यांनी प्रत्येक पीढीसोबत स्वत:ला कार्टूनच्या माध्यमातून जोडून ठेवलं. मात्र अखेरच्या काही दिवसात प्रकृती खालावल्यामुळे त्यांचा कुंचला शांत होता. अखेर 26 जानेवारी 2015 रोजी हा कुंचला कायमचा थांबला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Special Report on Devendra Fadnavis : सर्वसमावेशक अनुमोदन, देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदीSudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहितीEknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Embed widget