एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

25 September In History : पंडित दीनदयाळ उपाध्याय, इस्रोचे अध्यक्ष सतीन धवन यांचा जन्म; आज इतिहासात...

25 September In History : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत मोलाचे योगदान देणारे, शास्त्रज्ञ सतीन धवन, घटना तज्ज्ञ बॅ. नाथ पै यांचा आज जन्मदिन.

25 September In History : इतिहासात प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो.  भारतीय जनसंघाच्या संस्थापंकापैकी एक असलेले पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा आज जन्मदिन आहे. तर, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत मोलाचे योगदान देणारे, शास्त्रज्ञ सतीन धवन यांचा जन्मदिनही आज आहे. कवी अरुण कोलटकर आणि साहित्यिक शं.ना. नवरे यांचा आज स्मृतीदिन आहे. 

1916: जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म 

पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत यांचा महत्त्वाचा वाटा होता. भारतीय जनसंघातून पुढे भारतीय जनता पक्षाचा उगम झाला. पं. दीनदयाळ उपाध्याय 1937 साली कानपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे झाले आणि 1942 मध्ये प्रचारक झाले. साधी राहणी व उच्च विचारसरणी हा त्यांचा स्थायीभाव होता. शास्त्रे, धर्मग्रंथ, आणि तात्त्विक ग्रंथांच्या चिंतनातून व मननातून त्यांनी ‘एकात्ममानववाद’ हा सिद्धान्त मांडला व भारतीय समाजापुढे ठेवला.
 

1920 : इस्रोचे अध्यक्ष सतीश धवन यांचा जन्म

भारताच्या अंतराळ संशोधनाचे जनक समजले जाणारे डॉ. विक्रम साराभाई यांच्या आकस्मिक निधनानंतर इस्रोची धुरा सांभाळणारे शास्त्रज्ञ सतीश धवन यांचा आज जन्मदिन.  त्यांना भारतातील प्रायोगिक fluid dynamicsच्या संशोधनाचे जनक मानले जाते. त्यांचा जन्म श्रीनगरमधे झाला आणि शिक्षण भारत तसेच अमेरिकेत झाले. ग्रामीण शिक्षण, Remote Sensing तसेच Satellite Communicationच्या क्षेत्रात मुलभूत संशोधन केले. त्यांच्या प्रयत्नांनी भारत INSAT - दूरसंचार उपग्रह, IRS - दूरसंवेद उपग्रह आणि PSLV - Polar Satellite Lanch Vehicle यासारखे प्रकल्प यशस्वी करू शकला.

सतीश जाधव यांचे 3 जानेवारी 2002 रोजी निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ श्रीहरीकोटा येथील उपग्रह प्रक्षेपण स्थळाचे सतीश धवन अंतराळ केंद्र असे नामकरण करण्यात आले. 

1922: स्वातंत्र्यसैनिक आणि घटनातज्ज्ञ बॅ. नाथ पै यांचा जन्म

स्वातंत्र्य सैनिक, संसदपटू आणि निष्णात घटनातज्ज्ञ बॅ. नाथ पै यांचा जन्मदिन. महाविद्यालयातल असताना नाथ पै यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला होता. तत्कालीन भूमिगत चळवळींमध्ये त्यांचा मोठा वाटा होता. टपाल-कचेऱ्या लुटणे, पोलीस-कचेऱ्यांवर हल्ला करणे इ. कारणांसाठी त्यांच्यावर त्यावेळी खटले भरण्यात आले. तुरुंगातील बेदम मारामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला. त्यांनी गोवा मुक्ती आंदोलनातही सहभाग घेतला होता. ज्ञानसंपन्नत्ता व अखंड व्यासंगीवृत्ती तसेच गरिबांविषयीची कळकळ, हे त्यांचे स्थायीभाव होते. बेळगावच्या प्रश्नावर त्यांनी सतत लढा दिला. 

लोकसभेत त्यांचा स्पष्टवक्तेपणा, निर्भयपणा व चिकित्सक अभ्यास हे गुण दिसून येत. सुसंस्कृत राजकारणी अशा शब्दात देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी त्यांचा गौरव केला. गोलकनाथ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध लोकसभेत त्यांनी घटनादुरुस्ती विधेयक मांडले. ‘ज्या घटनेत दुरुस्ती होऊ शकत नाही, ती मृतवत होय’, असे त्यांनी ठणकावून सांगितले. त्यांच्या या विधेयकाची राष्ट्रीय पातळीवर चर्चा झाली. रोजगारी हा मूलभूत हक्क आहे आणि तो देता येत नसेल, तर सरकारने बेकारी भत्ता मंजूर करावा, असेही एक विधेयक त्यांनी मांडले होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचे मोठे योगदान होते.  

2004 : कवी अरुण कोलटकर यांचे निधन 

मराठी, हिंदी, व इंग्रजी भाषांत कविता करणारे भारतीय कवी अरूण कोलटकर यांचा आज स्मृतीदिन. मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्‌सचे पदवीधारक असलेले कोलटकर एक उत्तम ग्राफिक्स डिझायनर व जाहिरात क्षेत्रातील अत्यंत यशस्वी कलादिग्दर्शक होते. 1950-60च्या दशकांत त्यांनी लिहिलेल्या कविता या मुंबईतील विशिष्ठ बोली मराठीतल्या असून त्यात मुंबईत आलेल्या निर्वासितांच्या व गुन्हेगारांच्या जीवनाचे दर्शन घडते.

त्यांना 2005 मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. 

2013 : साहित्यिक शं.ना. नवरे यांचे निधन 

शंकर नारायण नवरे उर्फ शन्ना मराठी लेखक, नाटककार व पटकथाकार होते. मध्यमवर्गीय माणसाचे अनुभव व भावनाविश्व रेखणाऱ्या कथानकांसाठी ते ओळखले जातात. डोंबिवलीत झालेल्या 2003 सालच्या नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना लेखनातून मिळणाऱ्या पैशांचा मोठा हिस्सा ते पडद्यामागच्या कलाकारांसाठी खर्च करीत असत. कायम पडद्यामागे काम करणाऱ्या नाट्यकर्मींसाठी त्यांनी नाट्यसंमेलनातच 75 हजार रुपयांचा धनादेश दिला होता.


2020 : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची स्थापना 

भारतीय वैद्यकीय परिषदेच्या जागी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC) अस्तित्वात आला. भारतातील वैद्यकीय शिक्षण संस्था आणि वैद्यकीय व्यावसायिकांच्या नियमनासाठी धोरणे आखण्याचा अधिकार या आयोगाला आहे.

इतर महत्त्वाच्या घटना :

1928 : पत्रकार माधव गडकरी यांचा जन्म.
1941 : 'प्रभात'चा 'संत सखू' हा चित्रपट पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी प्रदर्शित झाला
1946: भारतीय क्रिकेट खेळाडू बिशनसिंग बेदी यांचा जन्म.
1956: साली अमेरिका आणि युरोप या राष्ट्रांमध्ये पहिली अंडर वाटर टेलिफोन सेवा सुरु झाली होती.
2003: जपानच्या होक्काइदो शहराजवळ समुद्रात 8.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
2017: साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना म्हणजेच ‘सौभाग्य’  योजनेची सुरुवात केली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale Exclusive : मंत्रि‍पदासाठी शिवलेला कोट आता तरी घालणार? भरत गोगावले म्हणतातBharat Gogawale on Uddhav Thackeray :उद्धव ठाकरेंचे आमदार संपर्कात पण लगेच काही करणं बरोबर दिसत नाहीMahayuti CM Oath Ceremony : शपथविधी कधी पर्यंत झाला पाहिजे? कायदेशीर बाजू नेमकी काय?Sunil Shelke Meet Ajit Pawar : अजितदादांनी सांगितला मोदी-शेळकेंच्या भेटीचा किस्सा #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
Maharashtra Assembly Election Results 2024 : महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
IPL Auction 2025 : युजवेंद्र चहलला लॉटरी, टीम इंडियात संधी मिळेना पण आयपीएलमध्ये पैशांचा वर्षाव, पंजाबकडून 18 कोटी खर्च
युजवेंद्र चहलला लॉटरी, टीम इंडियात संधी मिळेना पण आयपीएलमध्ये पैशांचा वर्षाव, पंजाबकडून 18 कोटी खर्च
ठाकरेंचा एकमेव मुस्लीम उमेदवार बनला आमदार; हारुण खान यांना खेचून आणला विजय, मताधिक्य किती?
ठाकरेंचा एकमेव मुस्लीम उमेदवार बनला आमदार; हारुण खान यांना खेचून आणला विजय, मताधिक्य किती?
Maharashtra Assembly Election Result 2024 : फक्त 162 मतांनी महायुतीच्या त्सुनामीत विजय खेचून आणलेला 'नशीबवान' उमेदवार माहीत आहेत का?
फक्त 162 मतांनी महायुतीच्या त्सुनामीत विजय खेचून आणलेला 'नशीबवान' उमेदवार माहीत आहेत का?
Embed widget