एक्स्प्लोर
21वी प्रसुती ऊसाच्या फडात, बीडमधील लंकाबाईच्या नवजात मुलीचा मृत्यू!
माजलगाव शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या केसापुरी कॅम्प परिसरात मालोजी देवीदास खरात हे पाल ठोकून मागील 12 ते 15 वर्षापासून वास्तव्यास आहेत. मालोजी यांची पत्नी लंकाबाई ही एकविसाव्या वेळेस गरोदर असल्याचा प्रकार समोर आला होता.
बीड : एकविसाव्या वेळी प्रसुती झालेल्या बीडमधील लंकाबाईंच्या नवजात मुलीचा मृत्यू झाला आहे. लंकाबाई यांनी ऊसाच्या फडात मुलीला जन्म दिला होता. लंकबाईंची यापूर्वी नऊ अपत्ये दगावली आहेत. वयाच्या चाळीशीमध्येच लंकाबाईंची आतापर्यंत एकवीस वेळा प्रसुती झाली आहे
यापूर्वी वीस वेळा प्रसुती झालेल्या लंकाबाई एकविसाव्या वेळी गर्भवती राहिल्या. या खेपेला त्यांची प्रसुती झाली, पण जन्मलेल्या नवजात मुलीचा मृत्यू झाला. लंकाबाई ऊस तोडणीच्या कामासाठी कर्नाटकमध्ये गेल्या होत्या, तिथेच ऊसाच्या फडात त्यांची एकविसाव्या वेळी प्रसुती झाली.
माजलगाव शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या केसापुरी कॅम्प परिसरात मालोजी देवीदास खरात हे पाल ठोकून मागील 12 ते 15 वर्षापासून वास्तव्यास आहेत. मालोजी यांची पत्नी लंकाबाई ही एकविसाव्या वेळेस गरोदर असल्याचा प्रकार समोर आला होता.
संबंधित बातम्या
रुग्णालयात उपचार घेण्यास नकार, 21व्यांदा गरोदर असलेली महिला घरी परतली
PHOTO | बीडची महिला 21व्या बाळाला जन्म देणार, पहिल्यांदाच रुग्णालयात प्रसुती होणार!
त्यांची सध्या नऊ मुली आणि दोन मुले सध्या जिवंत आहेत. तर नऊ अपत्ये बाळंतपणानंतर दगावली. आतापर्यंत त्या कधीच शासकीय अथवा खाजगी रुग्णालयात बाळांतपणासाठी दाखल झालेल्या नाहीत. विशेष म्हणजे लंकाबाईची आशा स्वयंसेविकेने रजिस्टर नोंद घेतली. मात्र त्यानंतरच्या कोणत्याही वैद्यकीय सुविधा लंकाबाईला मिळाल्या नाहीत.
ही बातमी एबीपी माझाने उजेडात आल्यानंतर आरोग्य यंत्रणेने त्यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले होते. मात्र दोन दिवस उपचार घेऊन लंकाबाईंनी जिल्हा रुग्णालयातून पळ काढला होता. त्यामुळे लंकाबाईंना उपचार देण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील यंत्रणा सुद्धा तोकडी पडली होती.
गेल्यावर्षीच एक मुलगा होऊन वारला आणि आता लगेच गरोदर. सहामायी पाळणा म्हणजे 18 महिन्यात दोनदा लेकरं होतात. लंकाबाईच्या चार मुली आणि एका मुलाचा विवाह झालेला आहे. त्यांनीही 3, 4 आणि 5 एवढी अपत्य जन्माला घातली आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
महाराष्ट्र
सोलापूर
भारत
Advertisement