एक्स्प्लोर
Advertisement
रुग्णालयात उपचार घेण्यास नकार, 21व्यांदा गरोदर असलेली महिला घरी परतली
लंकाबाईच्या चार मुली आणि एका मुलाचा विवाह झालेला आहे. त्यांचीही 3, 4 आणि 5 अशी अपत्य आहेत. आता एकविसाव्या बाळंतपणासाठी लंकाबाई तयार आहेत.
बीड : 21व्यांदा गरोदर असणाऱ्या माजलगावच्या लंकाबाईने बीडच्या जिल्हा रुग्णालयात नियमित उपचार घेण्यास नकार दिला आहे. ती महिला उपचार अर्धवट सोडून आपल्या घरी परतली आहे. एक तर हातावर पोट आणि त्यात नवऱ्यासह पाच-सहा लेकरांना सोडून स्वतः वर उपचार करण्यास त्यांनी नकार दिला.
माजलगाव केसापुरी कॅम्प इथे राहणाऱ्या लंकाबाई खरात या एकविसाव्यांदा गरोदर असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या महिलेला उपचारासाठी बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं.
बीडमध्ये महिला एकविसाव्यांदा बाळंत होणार
PHOTO | बीडची महिला 21व्या बाळाला जन्म देणार, पहिल्यांदाच रुग्णालयात प्रसुती होणार!
काल (9 सप्टेंबर) दिवसभर काही तपासण्या झाल्यानंतर डॉक्टरांनी पुढील दोन-अडीच महिने बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार करण्याचे लंकाबाई यांना सांगितलं होतं. पण घरी पाच-सहा लेकरं आणि संसार सोडून मी बीडच्या रुग्णालयात राहू शकत नाही, असं म्हणून अखेर ही महिला घरी परतली.
दरम्यान लंकाबाई खरात यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयाऐवजी माजलगावमधील उपजिल्हा रुग्णालयात उपचार झाले तर ती संसार चालवून उपचार घेऊ शकेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
Advertisement