एक्स्प्लोर

औरंगाबादची कचराकुंडी, शहरातील रस्त्यांवर 2 हजार टन कचरा

गेल्या पाच दिवसांपासून नारेगावच्या नागरिकांनी कचरा टाकण्यास विरोध केल्याने शहरातील रस्त्यांवर 2 हजार टनांपेक्षा अधिक कचऱ्याचे डोंगर उभा राहू लागले आहेत.

औरंगाबाद : पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराची कचराकुंडी झाली आहे. गेल्या पाच दिवसांपासून नारेगावच्या नागरिकांनी कचरा टाकण्यास विरोध केल्याने शहरातील रस्त्यांवर 2 हजार टनांपेक्षा अधिक कचऱ्याचे डोंगर उभा राहू लागले आहेत. प्रशासन आणि सत्ताधारी यावर अजूनही तोडगा काढू शकले नाहीत. औरंगाबादची कचराकुंडी, शहरातील रस्त्यांवर 2 हजार टन कचरा देश-विदेशातले पर्यटक औरंगाबाद शहरातलं हे घाणेरडं चित्र पाहत आहेत. शहरातील रस्ता असो वा गल्लीबोळ, सगळीकडे कचऱ्याचं साम्राज्य पसरलं आहे. सलग सहाव्या दिवशीही कचराकोंडीवर तोडगा काढण्यात औरंगाबाद महापालिका अपयशी ठरली आहे. नारेगावला जिथे महापालिकेचा कचरा डेपो आहे, ते ग्रामस्थ अजूनही डेपोत कचरा न आणू देण्यावर ठाम आहेत. औरंगाबादची कचराकुंडी, शहरातील रस्त्यांवर 2 हजार टन कचरा तब्बल 15 वर्षांपूर्वी हायकोर्टाने नारेगावचा कचरा डेपो बंद करण्याचे आदेश दिले होते. महापालिकेला पर्यायी जागा मिळाली नाही, त्यामुळे नारेगावचे लोक रस्त्यावर उतरले आणि शहराची कचराकोंडी झाली. आज गुरुसाहणी नगर भागातील एका नागरिकांने कचरा उचलणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचीही घटना घडली. दिवसेंदिवस कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. त्यामुळे महापौर नंदकुमार घोडेले यांनी महापालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांच्या राजाही रद्द केल्या आहेत. औरंगाबादची कचराकुंडी, शहरातील रस्त्यांवर 2 हजार टन कचरा महापालिकेच्या जेवढ्या कचरा उचलणाऱ्या गाड्या आहेत, तेवढ्या गाड्या कचरा भरून उभा आहेत. मात्र हा कचरा कुठे टाकायचा हा प्रश्न आहे. त्यामुळे कचऱ्याची दुर्गंधी येऊ नये म्हणून, त्यावर पावडर टाकली जात आहे, पण हे किती दिवस चालणार, असा प्रश्न आहे. औरंगाबाद महापालिकेवर 1988 पासून शिवसेना आणि भाजपची सत्ता आहे. त्याच्या आधीपासूनच नारेगावला कचरा टाकला जातो. मात्र, तरीही कुठल्याच महापौरांनी कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा म्हणून पुढाकार घेतला नाही. प्रशासनही कचरा डंप करण्यातच धन्यता मानत राहिलं आणि त्याचाच भस्मासूर झाल्याने आता शहर कचऱ्याने वेढलं आहे. आता महापालिका पुन्हा नारेगाववासियांचे पाय पकडणार आहे, त्यावरच सध्या तोडगा अवलंबून आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget