एक्स्प्लोर

Lata Mangeshkar: लातूरच्या औराद शहाजानी गावात मंगेशकरांच्या नावानं कॉलेज, निधीसाठी लतादीदींनी घेतला होता कार्यक्रम

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज निधन झाले. निधनानंतर लतादीदींच्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. ज्येष्ठ पत्रकार रविकिरण देशमुख यांनीही लतादीदींची एक आठवण सांगितली आहे.

Lata Mangeshkar passes away : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी निधन झाले. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर विविध स्तरातून शोक व्यक्त होत आहे. तसेच लतादीदींच्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. अशीच एक त्यांची आठवण ज्येष्ठ पत्रकार रविकिरण देशमुख यांनी सांगितली आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी या गावातील ही लतादीदींची आठवण देशमुख यांनी सांगितली आहे. यामधून लता मंगेशकर यांच्या संवेदनशिलतेचा प्रत्यय आला आहे. 

Lata Mangeshkar: लातूरच्या औराद शहाजानी गावात मंगेशकरांच्या नावानं कॉलेज, निधीसाठी लतादीदींनी घेतला होता कार्यक्रम

औराद शहाजानी या गावातील काही मंडळींनी 1970 मध्ये एका महाविद्यालयाची स्थापना करण्याचे ठरवले होते. स्थापन करण्यात येणाऱ्या महाविद्यालयाला राजकीय किंवा सामाजीक क्षेत्रातील व्यक्तीचे नाव न देता, एखाद्या संगीत किंवा सांस्कृतीक क्षेत्रातील व्यक्तीचे नाव देण्याचे ठरवण्यात आले. या महाविद्यालयाला गायक, संगीतकार मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे नाव देण्याचे गावातील मंडळींनी ठरवले. त्यानंतर औराद शहाजानी गावातील प्रमुख मंडळी लता मंगेशकर यांना भेटण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा याठिकाणी गेले. या सर्वांनी लतादीदींना आपल्या वडीलांचे दीनानाथ मंगेशकर यांचे नाव महाविद्यालयाला देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली. वडिलांच्या नावाने महाविद्यालय स्थापन होत आहे म्हटल्यावर मंगेशकर कुटुंबियांना खूप आनंद झाला.

Lata Mangeshkar: लातूरच्या औराद शहाजानी गावात मंगेशकरांच्या नावानं कॉलेज, निधीसाठी लतादीदींनी घेतला होता कार्यक्रम

दरम्यान, 1970 मध्ये महाविद्यालयाचा पायाभरणीचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मायी मंगेशकर आणि ग. दि. माडगूळकर हे दोन मान्यवर उपस्थित होते.  त्यानंतर 1976 मध्ये महाविद्यालयाच्या वास्तूच्या उद्धाटनाचा मोठा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला  त्यावेळचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, लता मंगेशकर, आमदार शिवराज पाटील चाकूरकर उपस्थित होते. यावेळी लतादीदींना असे सांगण्यात आले की, अद्याप महाविद्यालयाची इमारत अपूर्ण आहे. त्यासाठी निधी कमी पडत आहे. त्यानंतर लता मंगेशकर यांनी औराद शहाजानी या गावात 'लता मंगेशकर संगीत रजनीचा' कार्यक्रम करण्याचे ठरवले. त्यानंतर फेब्रुवारी 1981 लता मंगेशकर आणि त्यांच्या भावंडांनी एक उत्तम कार्यक्रम औराद शहाजानी या गावात केला. या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. तो कार्यक्रम खूप प्रसिद्ध झाला. त्या कार्यक्रमात मिळालेला निधी त्यांनी महाविद्यालयच्य इमारतीसाठी दिला. त्या कार्यक्रमाच्या आठवणी आजही लोकांच्या मनात असल्याचे देशमुख यांनी सांगितले. 

Lata Mangeshkar : जेव्हा महाविद्यालयाच्या निधीसाठी लता मंगेशकरांनी घेतला संगीत कार्यक्रम.. पाहा व्हिडीओ 

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: रस्त्यात अडवून मारहाण, मैत्रिणीचा जबडा केला फ्रॅक्चर, पुण्यातील धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?
रस्त्यात अडवून मारहाण, मैत्रिणीचा जबडा केला फ्रॅक्चर, पुण्यातील धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?
Eknath Shinde: गद्दार म्हणताच एकनाथ शिंदेंच्या डोक्यात तिडीक गेली, गाडीतून उतरुन रागात नसीम खान यांच्या कार्यालयात शिरले अन्...
गद्दार म्हणताच एकनाथ शिंदेंच्या डोक्यात तिडीक गेली, गाडीतून उतरुन रागात नसीम खान यांच्या कार्यालयात शिरले अन्...
शिंदेंकडील 8 आमदार 1 मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर श्रीकांत शिंदेंचा पलटवार; दिलं चॅलेंज
शिंदेंकडील 8 आमदार 1 मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर श्रीकांत शिंदेंचा पलटवार; दिलं चॅलेंज
Video: मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची दुसऱ्यांदा बॅग तपासली; दरवेळेला मीच पहिला गिऱ्हाईक म्हणत ठाकरेंकडून पुन्हा व्हिडीओ शूट
Video: मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची दुसऱ्यांदा बॅग तपासली; दरवेळेला मीच पहिला गिऱ्हाईक म्हणत ठाकरेंकडून पुन्हा व्हिडीओ शूट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : संतोष कटकेने अपशब्द वापरले, मुख्यमंत्र्‍यांनी गाडीतून उतरुन जाब विचारलाUddhav Thackeray Ausa Bag Checking : औसा येथे पुन्हा एकदा बॅगची तपासणी; सलग दुसऱ्यांदा तपासणीCM Eknath Shinde Angry : 'गद्दार'घोषणा शिंदे संतापले; काँग्रेस कार्यालयात घुसन विचारला जाबDevendra Fadnavis Speech Dahanu : शेतकऱ्यांच्या खात्यात 15 हजार जमा करणार ,देवेंद्र फडणवीसांची घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: रस्त्यात अडवून मारहाण, मैत्रिणीचा जबडा केला फ्रॅक्चर, पुण्यातील धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?
रस्त्यात अडवून मारहाण, मैत्रिणीचा जबडा केला फ्रॅक्चर, पुण्यातील धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?
Eknath Shinde: गद्दार म्हणताच एकनाथ शिंदेंच्या डोक्यात तिडीक गेली, गाडीतून उतरुन रागात नसीम खान यांच्या कार्यालयात शिरले अन्...
गद्दार म्हणताच एकनाथ शिंदेंच्या डोक्यात तिडीक गेली, गाडीतून उतरुन रागात नसीम खान यांच्या कार्यालयात शिरले अन्...
शिंदेंकडील 8 आमदार 1 मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर श्रीकांत शिंदेंचा पलटवार; दिलं चॅलेंज
शिंदेंकडील 8 आमदार 1 मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर श्रीकांत शिंदेंचा पलटवार; दिलं चॅलेंज
Video: मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची दुसऱ्यांदा बॅग तपासली; दरवेळेला मीच पहिला गिऱ्हाईक म्हणत ठाकरेंकडून पुन्हा व्हिडीओ शूट
Video: मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची दुसऱ्यांदा बॅग तपासली; दरवेळेला मीच पहिला गिऱ्हाईक म्हणत ठाकरेंकडून पुन्हा व्हिडीओ शूट
Ajit Pawar : अजितदादांची श्रीरामपूरमध्ये मोठी खेळी! जेलमध्ये असणाऱ्या माजी आमदाराच्या कुटुंबियांची घेतली अचानक भेट, पक्षाची ताकद वाढणार?
अजितदादांची श्रीरामपूरमध्ये मोठी खेळी! जेलमध्ये असणाऱ्या माजी आमदाराच्या कुटुंबियांची घेतली अचानक भेट, पक्षाची ताकद वाढणार?
Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिक पूर्वमध्ये राजकारण तापलं! 'माझ्याकडे निवडणुकीचा अजेंडा' राहुल ढिकलेंच्या वक्तव्यावर गणेश गीतेंचा हल्लाबोल, म्हणाले 'तुमचा अजेंडा...'
नाशिक पूर्वमध्ये राजकारण तापलं! 'माझ्याकडे निवडणुकीचा अजेंडा' राहुल ढिकलेंच्या वक्तव्यावर गणेश गीतेंचा हल्लाबोल, म्हणाले 'तुमचा अजेंडा...'
Maharashtra Election 2024: हरियाणात जे घडलं ते टाळायचं असेल तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करा, केजरीवालांच्या 'आप'ची मोठी मागणी
उद्धव ठाकरेंना आत्ताच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा, अन्यथा... केजरीवालांच्या 'आप'ची मोठी मागणी
नक्षलवादाला लगाम घालत या भागात आम्ही उद्योग आणले; चंद्रपुरात मोदींचं भाषण, काँग्रेस, मविआवर हल्लाबोल
नक्षलवादाला लगाम घालत या भागात आम्ही उद्योग आणले; चंद्रपुरात मोदींचं भाषण, काँग्रेस, मविआवर हल्लाबोल
Embed widget