Lata Mangeshkar : 'अखेरचा हा तुला दंडवत', राज ठाकरेंकडून लतादीदींना आदरांजली
Lata Mangeshkar Passes Away : भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज रविवारी सकाळच्या सुमारास निधन झाले. राज ठाकरे यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर करत लतादींदींना आदरांजली वाहिली आहे.
Lata Mangeshkar Passes Away : भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज रविवारी सकाळच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 93 व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय संगीतक्षेत्रातलं एक महत्वाचं पर्व लतादीदींच्या निधनानं संपलं आहे. लतादीदींच्या निधनावर विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.
राज ठाकरे यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर करत लतादींदींना आदरांजली वाहिली आहे. हा व्हिडीओ राज ठाकरे यांच्या जुन्या भाषणाचा आहे. या भाषणामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ''जगाचा इतिहास पाहिला तर हे निश्चित होतं की, जगाच्या आणि भारताच्या इतिहासात अशी एकमेव व्यक्ती आहे ज्या व्यक्तीने जेव्हापासून स्वत:च आयुष्य सुरु केलं अगदी तेव्हापासून पडता काळ पाहिला नाही, ती व्यक्ती म्हणजे लतादीदी. जगाच्या पाठीवर त्या अशा एकमेव व्यक्तिमत्व आहेत. त्यांचं करिअर सुर झाल्यास त्यांनी कायम उंची गाठली आहे.''
लता मंगेशकर यांच्या निधनानंतर दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा
केंद्र सरकारकडून दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. राष्ट्रध्वज तिरंगा अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. लतादीदींवर संपूर्णपणे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या अंत्यदर्शनाकरता जशी व्यवस्था शिवाजी पार्कवर करण्यात आली होती. त्याप्रमाणेच शिवाजी पार्कवरच लतादीदींच्या अंत्यदर्शनाकरता व्यवस्था होणार असल्याची माहिती आहे. महापालिका थोड्या वेळात शिवाजी पार्कात स्टेज उभारणार आहे. अंतिमविधी शिवाजी पार्क स्माशानभूमी येथे होणार आहे.
संबंधित इतर बातम्या
- Lata Mangeshkar : 20 भाषांमध्ये तब्बल 30 हजारांहून अधिक गाणी, लता मंगेशकरांचा सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम!
- Lata Mangeshkar passes away : युग संपले! लतादीदींच्या निधनानंतर संजय राऊत यांचे ट्वीट
- Lata Mangeshkar Death : गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन, वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha