एक्स्प्लोर

धक्कादायक... पब्जीत टास्क पूर्ण झाला नाही, नैराश्यातून 19 वर्षीय युवकाची चंद्रपुरात आत्महत्या

PUBG गेम लोकांच्या खासकरुन मुलांच्या आयुष्यासाठी घातक ठरु लागलाय.चंद्रपुरात पब्जी खेळातील टास्क पूर्ण करून न शकल्याने एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

चंद्रपूर :  PUBG गेम लोकांच्या खासकरुन मुलांच्या आयुष्यासाठी घातक ठरु लागलाय. यवतमाळमध्ये पब्जी गेममुळे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तसेच पंजाबमध्ये या गेमच्या नादात आईवडिलांचे 16 लाख रुपये उडवल्याची तसेच आंध्रप्रदेशमधील एका मुलाने पब्जीच्या नादात अन्न पाणी सोडलं आणि यातून वाढलेल्या आजाराने त्या मुलाचा बळी गेल्याच्या घटनेनंतर आता चंद्रपुरात पब्जी खेळातील टास्क पूर्ण करून न शकल्याने एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या पब्जी खेळाच्या व्यसनाने चंद्रपूर जिल्ह्यातील एका युवकाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी या शहरातील 19 वर्षीय युवक गौरव पाटेकर याने पब्जी खेळातील टास्क पूर्ण करून न शकल्याने आत्महत्या केली आहे. लॉकडाऊनच्या काळात घरीच वास्तव्याला असल्याने त्याला या पब्जी मोबाईल खेळाचे व्यसन जडले होते. दरम्यान काही दिवसांपूर्वी या पब्जी खेळातील एक टास्क पूर्ण होऊ न शकल्याने तो अस्वस्थ होता. अखेर त्याने आज आपल्या जवळच्या मित्राला फोन करत मी निराश झाल्याने आत्महत्या करत असून स्वतःच्या राहत्या घरी असलेल्या छताच्या पंख्याला गळफास लावून घेत जीवन संपवले. दरम्यान या खळबळजनक घटनेची चौकशी माजरी पोलीस करत असून पब्जी खेळाचा व्यसनी-क्रूर चेहरा या निमित्ताने पुढे आला आहे. गौरव हा नागपूर येथील रायसोनी कॉलेज येथे बी.कॉम.(प्रथम वर्ष) अभ्यासक्रमाला शिकत होता. मात्र लॉक डाउन सुरु झाल्याने तो गेल्या 5 महिन्यांपासून माजरी येथील आपल्या घरीच राहत होता. कॉलेज नसल्यामुळे गौरवकडे भरपूर रिकामा वेळ होता. या रिकाम्या वेळात तो दिवस-रात्र मोबाईल मध्ये व्यस्त असायचा आणि पब्जी गेम खेळत असे. त्याच्या पालकांनी अनेक वेळा त्याला समजविण्याचा आणि यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण गौरवच्या वागण्यात फरक पडला नाही. आई-वडिलांपासून लपून तो हा ऑनलाईन गेम खेळत असे. लॉकडाऊनच्या काळात त्याला या पब्जी मोबाईल खेळाचे जणू व्यसन जडले होते. दरम्यान काही दिवसांपूर्वी या पब्जी खेळातील एक टास्क पूर्ण होऊ न शकल्याने तो अस्वस्थ होता. अनेक वेळा प्रयत्न करून देखील तो हा टास्क पूर्ण करू शकला नाही. त्यामुळे गौरवने आपल्या एका मित्राला फोन करून मी निराश झाल्याने आत्महत्या करत असल्याचे सांगितले. गौरवच्या मित्राने याची माहिती तातडीने त्याच्या भावाला दिली पण त्याचा भाऊ खोलीमध्ये जाऊन पाहतो. तोपर्यंत उशीर झाला होता. गौरवने पब्जीच्या नादात स्वतःच्या राहत्या घरी छताच्या पंख्याला गळफास लावून घेत जीवन संपविले होते. तरुण मुलाच्या अशा प्रकारच्या आत्महत्येने गौरवचे आई-वडील कोसळून पडले आहे. गौरवचा हा मृत्यू परिसरातील लोकांच्या मनाला चटका लावून गेलाय. दरम्यान या खळबळजनक घटनेची चौकशी माजरी पोलीस करत आहेत मात्र पब्जी खेळाचा व्यसनी-क्रूर चेहरा या निमित्ताने पुन्हा एकदा पुढे आला आहे. मेट्रो शहरांमध्ये असलेला ऑनलाईन गेमिंग चा विळखा आता ग्रामीण भागावरही घट्ट झालाय. ऑनलाईन गेम्स मुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान तर होतच आहे पण त्याच्या व्यसनाने आणि नैराश्यामुळे मुलं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलताहेत हे अतिशय अस्वस्थ करणारे आहे. पब्जी खेळाच्या नादात याआधीही अशा घटना घडल्या आहेत. यवतमाळमध्ये पब्जी गेममुळे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती तर  पुण्यात एका युवकाचा गेम खेळताना ब्रेन स्ट्रोक आल्याने मृत्यू झाला होता. भिवंडीत पब्जी खेळण्यास मनाई केल्याने अल्पवयीन मुलाकडून मोठ्या भावाची हत्या केल्याची घटना घडली होती. तर भिवंडीतील मानसरोवर येथे राहणाऱ्या 17 वर्षीय मुलाने पबजीच्या नादापायी घर सोडून निघून गेल्याचा प्रकार घडला होता. पंजाबमधील एका 17 वर्षीय मुलाने पब्जीसाठी आपल्या आई-वडिलांच्या खात्यातील तब्बल 16 लाख रुपये खर्च केल्याचीही घटना घडली होती. संबंधित बातम्या PUBG Victim | पब्जीमुळे तरुणाची मानसिक अवस्था बिघडली, विचित्र हालचाल, असंबंध बडबड  पब्जीसाठी मुलाने आई-वडिलांचे 16 लाख रुपये उडवले! PUBG खेळू न दिल्याने मुलाने घर सोडले पब्जी खेळण्यास मनाई केल्याने अल्पवयीन मुलाकडून मोठ्या भावाची हत्या, भिवंडीतील धक्कादायक घटना पब्जी गेमवरुन वाद, पुण्यातील तरुणावर कोयत्याचे वार, दोन जण पोलिसांच्या ताब्यात
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Embed widget