17th December Headlines: आज मविआचा महामोर्चा; सुषमा अंधारे, संजय राऊतांच्या विधानाविरोधात भाजपचं माफी मांगो आंदोलन
मुंबई: आज महाविकास आघाडीचा महामोर्चा निघणार आहे. भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आलंय.
मुंबई: आज महाविकास आघाडीचा महामोर्चा निघणार आहे. भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आलंय. रिचर्ड्स अँड क्रूडास मिल पासून सकाळी 10.30 वाजता मोर्च्याला सुरूवात होईल. मोर्चासाठी सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त असेल.
सुषमा अंधारे, संजय राऊतांच्या विधानाविरोधात भाजपचं माफी मांगो आंदोलन
सुषमा अंधारे, संजय राऊतांच्या विधानाविरोधात भाजपचं माफी मांगो आंदोलन करणार आहे. आज भाजप नेते अतुल भातखळकर, कांदिवली पूर्व रेल्वे स्टेशनच्या बाहेर आंदोलन करणार अहेत. तर अमित साटम, आगरकर चौक, अंधेरी पूर्व रेल्वे स्टेशनच्या बाजूला आंदोलन करणार. मनोज कोटक, राम कदम, निलयोग मॉल, जवाहर रोड, घाटकोपर पूर्व येथे आंदोलन करणार.
हिंदुत्ववादी संस्थांकडून आज ठाणे बंद
हिंदुत्ववादी संघटनांकडून आज ठाणे बंदची हाक देण्यात आलीय. सुषमा अंधारे यांनी केलेल्या वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आलाय. या बंदला भाजप आणि शिंदे गटाने पाठिंबा दिलाय. ठाण्यासह कल्याण, डोंबिवलीतही आज बंदची हाक देण्यात आलीय.
18 तारखेच्या ग्रामपंचायत मतदानासाठी तयारी
धुळ्यात रविवारी होणाऱ्या ग्रामपंचायती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कर्मचाऱ्यांना मतदान साहित्यांचे वाटप केले जाणार आहे. 119 ग्रामपंचायतसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. अकोल्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केलीये. मतदान असलेल्या गावांमध्ये पोलिंग पार्टीज रवाना होतील. वाशिम जिल्ह्यात 18 डिसेंम्बर रोजी होऊ घातलेल्या 287 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केलीये. मतदान असलेल्या गावांमध्ये पोलिंग पार्टीज रवाना होतील.
पुण्यात Rum for soldiers, Run with soldiers’ चं आयोजन
पुणे- विजय दिवसानिमित्त ‘विजय रण- Rum for soldiers, Run with soldiers’ चं आयोजन करण्यात आलं आहे, पुणे रेसकोर्स, सकाळी 7 वाजता
जळगाव- दिव्यांगांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन
महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभागाच्या वतीने दिव्यांगांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. याच्या शुभारंभ साठी क्रीडामंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
नीलम गोऱ्हे विधिमंडळ अधिवेशनाच्या अनुषंगाने आज दुपारी नागपुरात
नागपूर- विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे विधिमंडळ अधिवेशनाच्या अनुषंगाने आज दुपारी नागपुरात दाखल होतील. त्यानंतर ते शिवसेनेच्या निवडक प्रतिनिधींसोबत भेट घेणार आहे. याशिवाय विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आज नागपुरात पोहोचतील आणि तयारीचा आढावा घेतील.