16th June Headlines: मुख्यमंत्री पिंपरीत तर उपमुख्यमंत्री धाराशिवमध्ये, नवाब मलिकांच्या याचिकेवर सुनावणी; आज दिवसभरात
16th June Headlines: नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. नवाब मलिक गेल्या वर्षभरापासून किडनीच्या विकारावरील उपचारांकरता कुर्ल्यातील खासगी रूग्णालयात दाखल आहेत.
16th June Headlines: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. दुपारी 3 वाजता थोरगाव येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. दुपारी 4.45 वाजता निगडी येथे महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा अनावरण सोहळा केलं जाणार आहे. यासह आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पाहूया
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धाराशिव दौऱ्यावर
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज ते कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या विकास कामाचं पाहणी करतील. तिथल्या आणखी नव्या कामाचा शुभारंभ केला जाईलं, त्याबरोबरच नव्या रेल्वे मार्गाची त्यासाठी झालेल्या निधीची तरतुदीची माहिती मोदी @9 या कार्यक्रमांतर्गत विविध विकास कामाची माहिती आणि त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता कार्यकर्त्यांसाठी जाहीर सभा होणार आहे.
लोकसभा जागावाटपाचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसची बैठक
आगामी लोकसभा निवडणुकांच्या जागा संदर्भात आढावा घेण्यासाठी काँग्रेसच्या कोअर कमिटीची पुन्हा एकदा बैठक आज होणार आहे. या बैठकीला राज्यातील सर्व वरिष्ठ नेते उपस्थित असतील. जवळपास 28 जागांची पहिल्या टप्प्यामध्ये काँग्रेस चाचपणी करत आहे. या संदर्भात चर्चा होईल आणि महाविकास आघाडी समोर किती जागांचा प्रस्ताव ठेवायचा याचीही चर्चा होण्याची शक्यता आहे.
जळगावात राष्ट्रवादी वाचन सेलचे अधिवेशन
समाजात वाचन संस्कृती वाढावी आणि समाज सूसंस्कृत व्हावा यासाठी राष्ट्रवादीकडून आणि यशंवत प्रतिष्ठानकडून ग्रंथालय सेलची उभारणी करण्यात आली आहे. या ग्रंथालय सेलचे आज राज्यस्तरीय अधिवेशन अमळनेर येथे होत असून यासाठी राष्ट्रवादी नेते शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत. सकाळी 8.30 वाजता अजित पवारांची पत्रकार परिषद होणार आहे. त्यानंतर सकाळी 9.30 वाजता अमळनेर येथे आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानापासून अधिवेशन स्थळ कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात येणार असून तिन्ही नेते या मध्ये सहभागी होणार आहेत. सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत अधिवेशन सुरू राहणार आहे. त्यानंतर दुपारी 2 वाजता शरद पवार यांची पत्रकार परिषद होणार आहे.
नाशिकच्या सप्तश्रृंगी मंदिर ड्रेसकोडवर निर्णयाची शक्यता
सप्तशृंगी देवी ड्रेसकोड बाबत आज रात्री निर्णय होण्याची शक्यता आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. दुपारी 3 वाजता थोरगाव येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. दुपारी 4.45 वाजता निगडी येथे महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा अनावरण सोहळा केलं जाणार आहे.
पालखी अपडेट –
ज्ञानोबांची पालखी आज सासवडहून निघेल आणि जेजुरी मुक्कामी असेल. तुकोबांची पालखी आज यवतहून निघेल वरवंड मुक्कामी असेल.
संत तुकाराम महारांचा पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची वाखारी येथील न्यू अंबिका कला केंद्राच्या माध्यमातून अनोखी सेवा करण्यात येते. हा अनोखा सोहळा दौंड तालुक्यातील वाखारीत आयोजित केला जातो. या ठिकाणी आलेल्या वारकऱ्यांना अन्नदानासह मनोरंजनात्मक कार्यक्रमाची मेजवानी दिली जाते. या कला केंद्रातील नर्तिकांकडून लावणीसह अभंगावरील नृत्यांचं सादरीकरण करुन मनोरंजन केलं जातं.
नवाब मलिकांच्या जामीन याचिकेवर सुनावणी
नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. नवाब मलिक गेल्या वर्षभरापासून किडनीच्या विकारावरील उपचारांकरता कुर्ल्यातील खासगी रूग्णालयात दाखल आहेत. किडनी प्रत्यारोपणासाठी मलिकांनी जामीनाची मागणी केली आहे. तसेच मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं जामीन नाकारल्याच्या निर्णयालाही मलिकांनी हायकोर्टात आव्हान दिलंय. मलिकांच्या तब्येतीबाबत नव्यानं दाखल वैद्यकीय अहवालांवर आज ईडी आपली भूमिका हायकोर्टात स्पष्ट करणार.