(Source: ECI/ABP News/ABP Majha)
16th July In History: मानवाचं चंद्रावर पहिलं पाऊल, भारतीय हॉकीपटू धनराज पिल्ले यांचा जन्म; आज इतिहासात
16th July In History: हॉकीच्या जगतात आपली छाप सोडणारे हॉकीपटू धनराज पिल्ले यांचा जन्म आजच्या दिवशी झाला. आजच्या दिवशीच मानवाने चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं.
16th July In History : इतिहासात प्रत्येक दिवसाचे महत्त्व आहे. आजच्या दिवसाचे ही महत्त्व आहे. सांस्कृतिक, साहित्यिक आणि समाजकारणाच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी चंद्रावर पहिलं मानवी पाऊल पडलं होतं. तर महान हॉकीपटू धनराज पिल्ले यांचा जन्म आज झाला. हिंदी चित्रपट अभिनेत्री कतरिना कैफचा जन्म देखील आजच्या दिवशी झाला.
1968: भारतीय हॉकीपटू धनराज पिल्ले यांचा जन्म
भारतीय इतिहासातील महान फील्ड हॉकी खेळाडूंपैकी एक म्हणून धनराज पिल्ले ओळखले जातात. 16 जुलै 1968 रोजी पुण्यातील खडकी येथे धनराज पिल्ले यांचा जन्म झाला. धनराज पिल्ले यांनी 1989 मध्ये वरिष्ठ भारतीय हॉकी संघासाठी पदार्पण केलं, 15 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात त्यांनी केली. 1994 मध्ये हिरोशिमा, जपान येथे झालेल्या आशियाई खेळांमध्ये धनराजची सर्वात संस्मरणीय कामगिरी होती. त्यांनी भारताच्या सुवर्णपदक विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
धनराज पिल्ले यांचं भारतीय हॉकीमधील योगदान योग्यरित्या ओळखलं गेलं आहे आणि त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. 1999 मध्ये भारतातील सर्वोच्च क्रीडा सन्मान, राजीव गांधी खेल रत्न यासह, त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांना अनेक पुरस्कार आणि प्रशंसा प्राप्त झाली. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना 2001 मध्ये, भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पद्मश्री देखील प्रदान करण्यात आला.
1969: चंद्रावर पहिला मानव उतरवणाऱ्या अपोलो-11 अंतराळयानाचं फ्लोरिडा येथून प्रक्षेपण.
चंद्रावर माणूस पहिल्यांदा उतरला आणि असं करणारा अमेरिका पहिला देश ठरला, त्याला जवळपास 54 वर्षं झाली आहेत. अमेरिका आणि जगाच्या इतिहासातच अपोलो 11 मोहिमेचं यश, हा मोठा क्षण होता. अमेरिकेची स्पेस एजन्सी असणाऱ्या नासाने या अपोलो प्रोगामसाठी भरपूर निधी आणि इतर गोष्टी पुरवल्या. अपोलो 11 मोहिमेसाठी 3 अंतराळवीरांची निवड करण्यात आली. बझ ऑल्ड्रिन, नील आर्मस्ट्राँग आणि मायकल कॉलिन्स या तिघांची चंद्रमोहिमेसाठी निवड करण्यात आली होती.
1984: हिंदी चित्रपट अभिनेत्री कतरिना कैफचा जन्म.
कतरिना कैफ एक ब्रिटिश-भारतीय वंशाची अभिनेत्री असून ती एक मॉडल आहे. ती बॉलिवूड चित्रपटांमधील उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. कतरिनाने तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केलं आहे. तिला भारतातील सर्वात आकर्षक सेलिब्रिटी मानलं जातं. आतापर्यंत कतरिनाने बॉलिवूडच्या बर्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यापैकी नमस्ते लंडन, पार्टनर, वेलकम, रेस, अजब प्रेम की गजब कहानी, दे दाना दन, एक था टायगर इत्यादी तिचे नावाजलेले चित्रपट आहेत.
इतर महत्त्वाच्या घटना
622: प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी मदिनेहून प्रयाण केलं. इस्लामिक हिजरी कॅलेंडरची या दिवसापासून सुरुवात झाली.
1909: स्वातंत्र्यसेनानी भारतरत्न (मरणोत्तर) अरुणा आसीफ अली यांचा जन्म.
1914: मराठी साहित्यिक वा. कृ. चोरघडे यांचा जन्म.
1945: अमेरिकेच्या पहिल्या अणुबॉम्बची चाचणी.
1968: विकिपीडिया चे सहसंस्थापक लैरी सेन्जर यांचा जन्म.
1973: दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेटपटू शॉन पोलॉक यांचा जन्म.
1992: भारताचे 9वे राष्ट्रपती म्हणून डॉ. शंकरदयाळ शर्मा यांची निवड झाली.
1998: गुजरातमध्ये शाळेतील प्रवेशाच्या वेळी पाल्याच्या नावानंतर आईलाही नाव लावण्याच्या अधिकाराचा निर्णय.