15th June Headlines: राज्यात आजपासून शाळा सुरू होणार, आषाढी वारीनिमित्त पालखी सोहळा; आज दिवसभरात...
15th June Headlines: राज्यात आज अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. आषाढीच्या निमित्ताने वारी सुरू आहेत. तर, दुसरीकडे राजकीय क्षेत्रातही घडामोडी असणार आहेत.
15th June Headlines: राज्यात आज अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. आषाढीच्या निमित्ताने वारी सुरू आहेत. तर, दुसरीकडे राजकीय क्षेत्रातही घडामोडी असणार आहेत. हायकोर्टात आज महत्त्वाच्या सुनावण्या पार पडणार आहेत. एक नजर आज दिवसभरातील संभाव्य महत्त्वांच्या घडामोडींवर....
आषाढी वारी विशेष
- संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचा सासवडमध्येच विसावा असणार आहे. त्यांचे बंधू संत सोपानदेव महाराज यांच्या पालखीचे दुपारी सासवडमधून प्रस्थान.
- संत तुकाराम महाराज पालखी- लोणी काळभोरहून पहाटे यवतकडे प्रस्थान ठेवणार.
- खासदार सुप्रिया सुळे पुरंदर येथे संत श्री सोपानकाका समाधी - पालखी प्रस्थान सोहळ्यास उपस्थिती राहतील.
पालघर
- 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमासाठी आज पालघरच्या कोळगाव मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत.
नागपूर
- भारत राष्ट्र समिती म्हणजेच बीआरएस या पक्षाचा महाराष्ट्रातील पहिला विभागीय कार्यालय आज नागपुरात सुरू होत आहे. कार्यालयाच्या उद्घाटनासाठी बीआरएस चे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव येणार आहेत.
सोलापूर
- सिद्धेश्वर सहकारी कारखान्याच्या चिमणीचे पाडकाम प्रक्रिया सुरू झाली आहे. आज प्रत्यक्ष चिमणी पाडका मला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
नंदुरबार
- राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आज नंदुरबार दौऱ्यावर असणार आहेत.
धुळे
- दोंडाईचा येथे विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा पार पडणार असून भाजपचे ज्ञानेश्वर भामरे हे कार्यकर्त्यासह राष्ट्रवादीत प्रवेश करणार.
मुंबई
- 15 जून ते 17 या दरम्यान देशातील 2000 पेक्षा जास्त आमदार मुंबईत येणार आहेत. मुंबईतील वांद्रे 'बीकेसी- जीओ कव्हेन्शन सेंटर' मध्ये 'राष्ट्रीय विधायक संमेलन-भारत' परिषदे पार पडणार आहे. पुणे येथील एमआयटी स्कूल ऑफ गर्व्हमेंटने या परिषदेचे आयोजन केलं आहे.
- मुंबई काँग्रेसच्या नवनियुक्त अध्यक्षा वर्षा एकनाथ गायकवाड आज पदभार स्विकारतील.
- साल 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फ़ोट खटल्यातील सगळ्यात महत्वाची साक्ष आज नोंदवण्यात येणार. या केसच्या तपास अधिका-याची कोर्टात साक्ष घेतली जाईल. या बहुचर्चित खटल्याची सुनावणी निर्णायक वळणावर. आजच्या सुनावणीत काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
- पुनर्विकासात अन्य रहिवाशांप्रमाणे 500 चौरस फूट जागा देण्याच्या मागणीसाठी वरळी येथील बीडीडी चाळींतील दुकानदारांच्यावतीनं बीडीडी चाळ संघानं मुंबई उच्च न्यायालयात याचिकी दाखल केली आहे, त्यावर आज सुनावणी.
- अब्रू नुकसानीप्रकरण आझम खान आज मुंबईतील वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात लावणार हजेरी. यावेळी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप तसेच मुंबई काँग्रेसचे प्रमुख नेते, आजी - माजी आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार
बुलढाणा
- राजमाता जिजाऊ यांचा 17 जून रोजी स्मृतिदिन... यानिमित्त सिंदखेडराजा जन्मस्थळ ते स्मृतिस्थळ रायगड जिल्ह्यातील पाचाड अशी अभिवादन यात्रा सिंदखेडराजा येथून राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करून आज सकाळी नऊ वाजता निघणार.
नाशिक
- वणीच्या सप्तश्रृंगी मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्याबाबत आणि शेंदूर स्तंभ उभारणी बाबत नाशिकमध्ये मंदिर संस्थानच्या नवनियुक्त अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली विश्वस्तांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे.
जळगाव
- मानव तस्करी प्रकरणात मौलाना मोहम्मद अंजर याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी आहे
- शरद पवार हे पक्षाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन दिवसाच्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.
अहमदनगर
- राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे अहमदनगर दौऱ्यावर असणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत नगरच्या स्नेहालय संस्थेच्या इंग्लिश मीडियम स्कूल येथे सकाळी 10 वाजता "स्कूल चले हम" कार्यक्रम होणार आहे.