एक्स्प्लोर

14th March In History : आइनस्टाईन यांचा जन्म तर स्टीफन हॉकिंग, कार्ल मार्क्सचं निधन, भारतातील पहिला बोलपट 'आलमआरा' प्रदर्शित; आज इतिहासात

On This Day In History : साम्यवादी विचारसरणीचा जनक असलेल्या कार्ल मार्क्सचे 14 मार्च 1883 रोजी निधन झालं. दास कॅपिटल हा त्याचा गाजलेला ग्रंथ आहे. 

14th March In History : विज्ञानाच्या इतिहासात आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाच्या दिवसांपैकी एक आहे. वास्तविक या दिवशी एका महान शास्त्रज्ञाचा जन्म झाला आणि याच दिवशी आणखी एका महान शास्त्रज्ञाने जगाचा निरोप घेतला. 14 मार्च रोजी महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन यांचा जन्मदिन आहे. तर याच दिवशी स्टीफन हॉकिंग यांचा मृत्यू झाला आहे. सापेक्षता सिद्धांत आणि वस्तुमान आणि ऊर्जा यांच्यातील संबंध देणारे महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन यांचा जन्म 14 मार्च 1879 रोजी झाला आणि अवकाश भौतिकशास्त्राची पुनर्रचना करणारे दुसरे महान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे 14 मार्च 2018 रोजी निधन झाले. या दोन्ही शास्त्रज्ञांची महान प्रतिभा निर्विवादपणे स्वीकारली गेली. 

देशाच्या आणि जगाच्या इतिहासात 14 मार्च या तारखेला नोंदवलेल्या आणखी काही महत्त्वाच्या घटनांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

1879: अल्बर्ट आइनस्टाईन यांचा जन्म 

आपल्या सापेक्षतेच्या सिद्धांताने विश्वाची अनेक रहस्ये उकलणारे महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन यांचा जन्मदिन आहे. आइनस्टाईन हे वस्तुमान,ऊर्जा आणि वेगाचे समीकरण E=mc² साठी ओळखले जातात. 

आइन्स्टाईन यांनी सापेक्षता (1905) आणि सामान्य सापेक्षता सिद्धांत (1916) यासह अनेक योगदान दिले. आइनस्टाईन यांना फोटोइलेक्ट्रीक इफेक्टसाठी नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. 1999 मध्ये टाईम मासिकाने त्यांना द पर्सन ऑफ द सेंच्यूरी (The Person Of The Century)  म्हणून गौरवण्यात आलं आहे. 

आइन्स्टाईन यांनी 300 हून अधिक वैज्ञानिक शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. 5 डिसेंबर 2014 रोजी, विद्यापीठे आणि संग्रहणांनी 30,000 हून अधिक अद्वितीय आइन्स्टाईन डॉक्युमेंट्स आणि लेटर्स प्रदर्शित करण्याची घोषणा केली. आइन्स्टाईन यांच्या बौद्धिक कर्तृत्वाने आणि वेगळेपणामुळे 'आइन्स्टाईन' हा शब्द 'बुद्धिमान' असा समानार्थी बनला आहे.

1883: महान अर्थशास्त्रज्ञ कार्ल मार्क्स यांचे निधन

जगातील महान साम्यवादी लेखक, इतिहासकार, राजनितीक सिद्धांतकार, पत्रकार कार्ल मार्क्सचे (Karl Marx) निधन 14 मार्च 1883 रोजी झाला. साम्यवादी विचारसरणीचा जनक अशी कार्ल मार्क्सची ओळख आहे. भांडवलवादी विचारसरणीमुळे होणाऱ्या शोषणावर त्यांनी साम्यवादी विचारसरणी मांडली. 

कार्ल मार्क्सने जर्मनीमध्ये कामगारांना संघटित करत कम्युनिस्ट लीगच्या स्थापनेत सक्रिय योगदान दिलं. त्याचा मित्र फेर्ड्रिक एगंल्स याच्या मदतीने त्याने कम्युनिस्ट मॅनिफेस्टो प्रकाशित केलं. 

कार्ल मार्क्सने 'दास कॅपिटल' हा महान ग्रंथ लिहिला. त्याचा पहिला भाग त्याने 1867 साली प्रकाशित केला. दास कॅपिटलचा दुसरा भाग त्याचा मित्र एगंल्सने संपादित आणि प्रकाशित केला. 'वर्गसंघर्ष' हा सिद्धांत मार्क्सच्या 'वैज्ञानिक साम्यवादाचा' कणा आहे. 

1864 मध्ये लंडनमध्ये 'इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन' ची स्थापना करण्यात मार्क्सने फार महत्त्वाची भूमिका बजावली. युनियनच्या सर्व घोषणा, धोरणे आणि कार्यक्रम मार्क्सनेच तयार केले होते. युनियनचे काम वर्षभर सुरळीत चालले, पण बाकुनिनच्या अराजकतावादी चळवळीमुळे, फ्रेंच-जर्मन युद्धामुळे आणि पॅरिस कम्युन्समुळे 'इंटरनॅशनल लेबर युनियन' विसर्जित झाली. परंतु अनेक देशांत समाजवादी आणि मजूर पक्षांच्या अस्तित्वामुळे त्याची प्रचीती येते.

1913: मल्याळम लेखक शंकरनकुट्टी पोट्टेक्कट्ट यांचा जन्म

शंकरनकुट्टी कुंजीरमन पोट्टेक्कट्ट हे मल्याळम साहित्याचे लेखक आणि केरळमधील राजकारणी होते. केरळमधील पर्यटनावरही त्यानी लिखान केलं असून अनेक प्रवासवर्णने लिहिली आहेत.

1931: पहिला बोलपट भारतीय चित्रपट 'अलमारा' प्रदर्शित

अलमारा (Alamara) हा हिंदी भाषेतील चित्रपट आणि भारतातील पहिला बोलपट आहे. 14 मार्च 1931 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि भारतात बोलपटाचा काळ सुरू झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शक अर्देशीर इराणी आहेत. सिनेमातील आवाजाचे महत्त्व ओळखून इराणी यांनी इतर अनेक समकालीन ध्वनी चित्रपटांपूर्वी अलमारा पूर्ण केला. 14 मार्च 1931 रोजी मुंबई येथील मॅजेस्टिक सिनेमात आलमआरा प्रथम प्रदर्शित करण्यात आला. 

1965: चित्रपट अभिनेता आमिर खानचा जन्म

चित्रपट अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, पटकथा लेखक आमिर खानचा (Aamir Khan) जन्म 14 मार्च 1965 रोजी झाला. नासिर हुसैन यांच्या 'यादों की बारात' (1973) या चित्रपटात बालकलाकार म्हणून दिसलेल्या, खानच्या कारकिर्दीची सुरुवात अकरा वर्षांनंतर 'होली' (1984) या चित्रपटाने झाली. 'कयामत से कयामत तक' चित्रपटातील अभिनयासाठी त्याला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण पुरस्कार मिळाला. आमिर खानला राजा हिंदुस्तानी (1996) साठी पहिला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

1998: सोनिया गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या

आजच्याच दिवशी 14 मार्च रोजी सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. काँग्रेस अध्यक्षा म्हणून त्यांचा कार्यकाळ पक्षाच्या इतिहासातील सर्वात मोठा आहे. 2004 आणि 2009 मध्ये काँग्रेसचं केंद्रात सरकार स्थापन करण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली. फोर्ब्सच्या सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत त्यांना अनेक वेळा स्थान मिळाले आहे. सोनिया गांधी या काँग्रेसच्या 132 वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक काळ अध्यक्ष राहिलेल्या आहेत.

2013: शी जिनपिंग यांनी चीनची सत्ता हाती घेतली

चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे नेते शी जनिपिंग (Xi Jinping) यांनी 14 मार्च 2013 रोजी चीनची सत्ता हातात घेतली. तेव्हापासून आतापर्यंत त्यांचं कम्युनिस्ट पक्षावर आणि चीनवर एकहाती नियंत्रण आहे.

2016: रशियाने सीरियातून आपले सैन्य मागे घेण्याची घोषणा

2018: स्टिफन हॉकिंग यांचं निधन

केंब्रिज विद्यापीठातील सैद्धांतिक भौतिकशास्त्र आणि गणिताचे प्राध्यापक स्टीफन हॉकिंग यांचे 14 मार्च 2018 रोजी निधन झालं. विश्वविज्ञान क्षेत्रातील त्यांचे महत्त्वपूर्ण संशोधन कार्य हे शारीरिक अपंगत्व असूनही त्यांच्या जिद्द आणि प्रबळ इच्छाशक्तीचे उदाहरण आहे. ब्लॅक होल आणि थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी यामध्ये त्यांचं काम उल्लेखनीय आहे. हॉकिंग यांनी केवळ व्हीलचेअरवर बसून क्वांटम ग्रॅव्हिटी आणि कॉस्मॉलॉजीचा अभ्यास केला आणि आइन्स्टाईननंतर ते जगातील सर्वात मोठे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ बनले.

स्टिफन हॉकिंग यांची पुस्तकं 

  • The Large Scale Structure of Space-Time (1973; coauthored with G.F.R. Ellis), 
  • Superspace and Supergravity (1981) 
  • The Very Early Universe (1983) 
  • A Brief History of Time: From the Big Bang to Black Holes (1988)
  • The Universe in a Nutshell (2001)
  • A Briefer History of Time (2005)
  • The Grand Design (2010; coauthored with Leonard Mlodinow).

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Aditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोलाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Embed widget