एक्स्प्लोर

13th March In History : स्वातंत्र्यसैनिक उधम सिंह यांनी जालियनवाला बागेचा घेतला बदला; आज इतिहासात

13th March In History : स्वातंत्र्यसैनिक उधम सिंह यांनी 19 मार्च 1940 साली मायकल ओडवायरची हत्या करून जालियनवाला बागेचा बदला घेतला.

13th March In History : होमरूल आंदोलनाने निर्माण झालेला असंतोष दडपून टाकण्यासाठी ब्रिटिश सरकारने 1919 साली रौलट कायदा संमत केला. या अन्यायकारक कायद्याविरोधात पंजाब प्रांतात प्रखर स्वरुप धारण झाले. ब्रिटीश सरकारने हा लढा थांबवण्यासाठी दडपशाहीचे सत्र सुरु केले. ब्रिटीश अधिकारी जनरल डायरने अमृतसरमध्ये सभाबंदीचा हुकूम जारी केला. महात्मा गांधी यांना पंजाब प्रांतात प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. डॉ. सत्यपाल व डॉ. सैफुद्दिन किचलु यांसारख्या प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली होती. या घटनांच्या निषेधार्थ 13 एप्रिल 1919 साली अमृतसर येथील जालियनवाला बागेत बैसाखी सणाच्या निमित्ताने एक सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी जमलेल्या नि:शस्त्र लोकांवर जनरल डायरने बेछूट गोळीबार केला. या हत्याकांडात सुमारे 400 लोक मारले गेले. असंख्य लोक जखमी झाले. या हत्याकांडास पंजाबचा शासक मायकल ओडवायर जबाबदार होता. 19 मार्च 1940 साली मायकल ओडवायरची स्वातंत्र्यसैनिक उधम सिंह यांनी भरसभेत गोळ्या घालून हत्या केली. 

1996 : अभिनेते शफी इनामदार यांची पुण्यतिथी 

शफी इनामदार हे असे अभिनेते होते ज्यांना आजची कोणत्याही परिचयाची गरज नाही. शफी अशा कलाकारांपैकी एक होते जे केवळ छोट्या पडद्यावरच नव्हे तर बॉलिवूड चित्रपटांमध्येही प्रसिद्ध होते. शफी यांनी जरी 1982 मध्ये आलेल्या 'विजेता' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, पण 1983 मध्ये आलेल्या 'अर्ध सत्य' या चित्रपटातून त्यांना इंडस्ट्रीत खरी ओळख मिळाली. ज्यात त्यांनी साकारलेल्या इन्स्पेक्टर हैदर अलीच्या भूमिकेचे लोकांनी खूप कौतुक केले. मोठ्या पडद्यासोबतच छोट्या पडद्यावरील 'ये जो है जिंदगी' या मालिकेत शफी इनामदार यांनी अतिशय दमदार भूमिका साकारली होती. एवढेच नाही तर शफी यांनी 'हम दो' या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते, ज्यामध्ये ऋषी कपूर आणि नाना पाटेकर यांच्यासोबत पूजा भट्टही दिसली होती. 1996 मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात क्रिकेट वर्ल्ड कपची सेमीफायनल खेळली जात होती. हा सामना पाहताना शफी यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.

2002: निर्माता आणि दिग्दर्शक नासिर हुसेन यांची पुण्यतिथी

13 मार्च या दिवशी पटकथा लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक नासिर हुसेन यांचे निधन झाले. नासिर हुसेन हे मसाला चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जात होते. 70 आणि 80 च्या दशकात त्यांचे असे अनेक चित्रपट होते जे आजही अनेकांच्या स्मरणात आहेत. 

देशाच्या आणि जगाच्या इतिहासात 13 मार्च या तारखेला नोंदवलेल्या इतर महत्त्वाच्या घटना: 

1800: बाळाजी जनार्दन भानू उर्फ ‘नाना फडणवीस’ यांची पुण्यतिथी– पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी, पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी हे अर्धे शहाणे.  

1956: कसोटी क्रिकेट खेळण्याचा दर्जा मिळाल्यानंतर न्यूझीलंडने 26 वर्षात पहिला विजय मिळवला. 

1992: तुर्कस्तानमध्ये झालेल्या भूकंपात सुमारे 500 लोकांचा मृत्यू झाला आणि हजारो लोक बेघर झाले.

2004: प्रसिद्ध सितार वादक उस्ताद विलायत खान यांचे निधन, भारतीय शास्त्रीय संगीताचे महान व्यक्तिमत्व.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget