13 February Headlines: शेगावात गजानन महाराजांचा प्रकटदिन सोहळा, मुंबईत आजपासून धावणार डबलडेकर एसी बस; आज दिवसभरात
13 February Headlines: संसदेत विरोधक अदानी समूहाच्या मुद्यावरून आक्रमक होण्याची शक्यता आहे. तर, बुलढाण्यातील शेगावात गजानन महाराजांचा प्रकटदिन सोहळा पार पडणार आहे. मुंबईत आजपासून एसी डबलडेकर बस धावणार आहे.
![13 February Headlines: शेगावात गजानन महाराजांचा प्रकटदिन सोहळा, मुंबईत आजपासून धावणार डबलडेकर एसी बस; आज दिवसभरात 13 february headlines today in news pune kasba and chinchwad bypoll updates Mumbai BEST AC Double Decker Bus CM Eknath Shinde Nashik 13 February Headlines: शेगावात गजानन महाराजांचा प्रकटदिन सोहळा, मुंबईत आजपासून धावणार डबलडेकर एसी बस; आज दिवसभरात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/12/260e3c7d223cbfa1ea87d875bf3db2e21676224699753290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
13 February Headlines: साप्ताहिक सुट्टीनंतर आज संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज होणार आहे. अदानी समूहाच्या मुद्यावर विरोधक आजही आक्रमक राहण्याची शक्यता आहे. राज्यातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर असणार आहेत. मुंबईत एससी डबलडेकर बसची सुरुवात होणार आहे. जाणून घेऊयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी...
मुंबई
- राज्य सरकारने स्थापना केलेल्या राज्य आर्थिक सल्लागार समितीची आज पहिली बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणार आहे.
- भारतातील पहिली इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार आहे. 85 वर्षाचा इतिहास असलेली आणि मुंबईची वेगळी ओळख असलेली डबल डेकर बस आता नव्या रुपात मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस आज बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहे.
- व्हिडिओकॉनचे संस्थापक वेणुगोपाल धूत यांनी ईडीच्या कारवाईविरोधात हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी.
बुलढाणा
- शेगावमध्ये संत गजानान महाराज यांचा 145 वा प्रकटदिन सोहळा होणार आहे. यासाठी राज्यासह, गुजरात, मध्यप्रदेशमधून लाखो भाविक शेगावमध्ये दाखल झाले आहेत. कोरोनानंतर पहिल्यांदाच निर्बंधमुक्त सोहळा होत असल्यानं भाविकांमध्ये उत्साहाच वातावरण आहे.
अहमदनगर
संगमनेर- नागपूर अधिवेशनादरम्यान झालेल्या दुखापतीनंतर माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात पहिल्यांदाच आपला मतदार संघ संगमनेरमध्ये येणार आहेत. अनेक दिवसानंतर मतदार संघात येत असल्यामुळं काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत होणार आहे.
पुणे
- पुणे - कसबा पेठचे कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे, नाना पटोले आणि जयंत पाटील एकत्र असणार आहेत.
- चिंचवड : महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना कृष्णाजी काटे यांच्या प्रचाराकरिता विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे.
नाशिक
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत उद्योग मंत्री उदय सामंत, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटीलदेखील असणार आहेत. मालेगाव आणि नांदगावमध्ये विविध कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रम होणार असून मनमाडकरसाठी पाणी पुरवठा योजना, शिवसृष्टीचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
- आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 22 वा दीक्षांत समारंभ सोहळा आज पार पडणार आहे.
रत्नागिरी
- गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त आज नाणीज इथं भव्य शोभायात्रेचे आयोजन
नागपूर
- महाराष्ट्र जीवन उन्नती अभियान अंतर्गत वर्धा जिल्ह्यात कार्यरत असलेल्या बचत गटातील महिलांचे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घर आणि कार्यालयासमोर आंदोलन होणार आहे. यावेळी हनुमान चालीसा पठण होणार आहे.
>> इतर
दिल्ली
- अदानीच्या मुद्यावर आजही संसदेत गोंधळ होण्याची शक्यता आहे... रजनी पाटील यांच निलंबन आणि अदाणी ग्रुपच्या चौकशीच्या मुद्यावंर चर्चा करावी यासाठी गोंधळ होण्याची शक्यता आहे.
- हिंडनबर्ग रिपोर्ट प्रकरणी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि सेबीकडून उत्तर मागवल होत त्यावर सुनावणी होणार.
त्रिपुरा
- पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 3.30 वाजता अगरताळा येथे निवडणूक प्रचार रॅलीला संबोधीत करतील.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)